IPL 2021: आरसीबीचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेला म्हणाला 'बदक'; वाचा काय घडलं केकेआरविरुद्धाच्या सामन्यात

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 19, 2021 | 08:58 IST

कर्णधार विराट कोहली(Virat Kohli)चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयाच्या शर्यतीत स्वार झाला आहे.

IPL 2021 RCB player Glenn Maxwell called duck Read what happened in the match against KKR
आरसीबीचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेला म्हणाला 'बदक'  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • केकेआरला परभूत करत आरसीबीचा सलग तिसरा विजय
  • सिराजने १९ व्या षटकात दिली फक्त एक धाव
  • एबी डिव्हिलियर्सने नाबाद राहत ३६ चेंडूमध्ये ७६ धावा केल्या

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयाच्या शर्यतीत स्वार झाला आहे. रविवारी झालेल्या केकेआरविरुद्धच्या (Kolkata Knight Riders) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(Royal Challengers Bangalore) ने ३८ धावा राखून विजय मिळवला. बंगळुरूचा हा तिसरा विजय आहे. सामना झाल्यानंतर जोरदार फटकेबाजी करणाऱ्या मॅक्सवेलला बंगळुरूच्या एका महत्त्वाच्या खेळाडू एक अनोखी उपमा दिली. 

दरम्यान या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ने ४९ चेंडूमध्ये ७८ धावांची खेळी केली. तर एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) ने नाबाद राहत ३६ चेंडूमध्ये ७६ धावा केल्या. या धावसंख्येमुळे बंगळुरूने २०४ धावाचं आव्हान केकेआरला दिलं होतं. हा सामना झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ग्लेन मॅक्सवेलला आपल्या नव्या संघात रुळण्यास काही अडचण आली नाही. तर फ्रेंचायजीविषयी एबी डिव्हिलियर्सच्या प्रेमामुळे सध्याच्या हंगामातील इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)  मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  योग्य दिशेने वाटचाल करत आहे. तर मॅक्सवेल पहिल्यांदा आरसीबीकडून खेळत आहे.

सामना संपल्यानंतर कोहली आपल्या सादरीकरणात म्हणला की, 'मॅक्सवेलने संघात स्वता:ला सामावून घेतलं आहे. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे एखादे बदक पाणी बसते'. एबी पण आपल्या संघाला प्रेम देतो. आज  दोन्ही खेळाडूने संघाविषयीचे प्रेम दाखवून  दिलं. निम्मे षटक संपल्यानंतर मी म्हणालो की, 'आपण २०० धावा बनवू, कारण दोन खेळी चांगल्या झाल्या होत्या. मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली एबीने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला. तो जेव्हा आपल्या  लयात खेळतो तेव्हा त्याला थांबवणं कठीण असतं. खेळपट्टी हळू झाली असतानाही आम्ही अतिरिक्त ४० धावा घेतल्या'.

कोहलनीने गोलंदाजांचं केलं कौतुक 

कोहलीने आपल्या विजयाचं श्रेय गोलंदाजांना दिलं. विशेषकरून सिराजला, त्याने १९ व्या षटकात रसेलला फक्त एक धाव दिली. 'ऑस्टेलिया दौऱ्यानंतर तो खूप वेगळा गोलंदाज बनला असून त्याने आज सामना संपवला', असल्याचं कोहली म्हणाला. दरम्यान आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून २०४ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने ८ गडी गमावून १६६ धावा केल्या. केकेआर आतापर्यंत दोन सामन्यात पराभूत झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी