IPL 2021: पॉईंट्स टेबलच्या अग्रस्थानी रॉयल चॅलेंजर्स, पर्पल कॅपही बंगळुरूकडे

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 15, 2021 | 16:44 IST

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाने झाली. आता पर्यंत सहा सामने खेळली गेली असून, सर्व सामने हे खूप रोमांचित झाले आहेत.

IPL 2021 Royal Challengers tops points table Purple Cap to Bangalore
IPL 2021: पॉईंट्स टेबलच्या अग्रस्थानी रॉयल चॅलेंजर्स   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • आयपीएल १४ व्या हंगामात आतापर्यंत झाले सहा सामने
  • आयपीएल १४ व्या सत्रात आरसीबीचा सलग दुसरा विजय
  • पपर्ल कॅपही बंगळुरूच्या खेळाडूकडे

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाने झाली. आता पर्यंत सहा सामने खेळली गेली असून, सर्व सामने हे खूप रोमांचित झाले आहेत. दरम्यान या सर्वा संघामध्ये बंगळुरू पुढे दिसत आहे. दोन सामन्यात चार पाईंट्स आरसीबी पाईंट्सच्या तक्ते पहिल्या स्थानी आहे.दिल्ली कॅपिटल्सनेही आयपीएलच्या १४ व्या हंगामात चांगली सुरुवात करत दोन पाईंट्स घेऊन दिल्ली +०.७७९ च्या नेट रन रेटसह दुसऱ्यास्थानी आहे.

तर पहिल्या सामन्यात पराभूत होऊन दुसरा सामना आपल्या नावे करणार मुंबई इंडियन्स संघ दोन सामन्यात दोन पाईंट्स आणि +०२२५ च्या नेट रन रेटसह तिसऱ्यास्थानी आहे. पंजाब किंग्सने पण राजस्थान रॉयल्सला पराभूत करत या हंगामातील आपला प्रवास सुरू केला. पंजाब किंग्सने दोन पॉईट्स आणि +०.२०० च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे. कोलकत्ता नाइटराइडर्स दोन सामन्यात दोन पॉईंट्ससह पाचव्या स्थानी आहे. 

दरम्यान यात तीन असे संघ आहेत त्यांनी पाईंट्स टेबलमध्ये अजून आपल्या नावाचा तक्ता तयार केलेला नाही. राजस्थान रॉयल्स -०.२०० च्या नेट रन रेटसह सहाव्या स्थानी आहे तर सनरायझर्स हैदराबादचा संघ दोन्ही सामन्यात पराभूत झाला आहे. या पराभवामुळे सनरायझर्स -०.४००च्या नेट रन रेटसह सातव्या स्थानी आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स -०.७७९ च्या नेट रनरेटसह पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहे. 

नितीश राणाने मिळवली ऑरेंज कॅप 
कोलकाताचा सलामी फलंदाज नितीश राणा याने ऑरेंज कॅप मिळवली आहे. राणाने दोन सामन्यात १३७ धावा बनवून ऑरेंज कॅपधारक झाला आहे. तर ११९ धावा करुन संजू दुसऱ्या स्थानी आहेत तर ९९ धावा बनवून मनीष पांडे तिसऱ्यास्थानी आहेत.

आरसीबीच्या खेळाडूकडे पर्पल कॅप

आरसीबीचा डेथ ओव्हर स्पेशिलिस्ट हर्षल पटेलने पर्पल कॅप मिळवली आहे. दोन्ही सामन्यात हर्षलने सात विकेट्स घेतल्या आहेत. आंद्र रसेल ६ विकेट घेऊन दुसऱ्यास्थानी आहे. चार विकेट मिळवून राशीद खान तिसऱ्यास्थानी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी