IPL 2021: शिखर धवनच्या 'या' कामामुळे अनेकांची तोंडं झाली बंद

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 19, 2021 | 19:37 IST

इंडियन प्रीमियर लीग २०२१ (Indian Premier League 2021) च्या १४ व्या हंगामात रोमांचक सामने पाहण्यास मिळत आहे.आतापर्यंत झालेले सामने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणारे ठरले.

IPL 2021 : shikhar dhawan most runs in ipl
शिखर धवनच्या 'या' कामामुळे अनेकांची तोंडं झाली बंद  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखर ठरला 'मॅन ऑफ द मॅच'
  • धवनने केल्या ४९ चेंडूत ९२ धावा
  • आयपीएल २०२१ च्या हंगामात धवनने केल्या १८६ धावा

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२१ (Indian Premier League 2021) च्या १४ व्या हंगामात रोमांचक सामने पाहण्यास मिळत आहे. आतापर्यंत झालेले सामने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणारे ठरले. रविवारी झालेली पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)चा सामना असाच ठरला. या सामन्यात गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan) ने जोरदार फटकेबाजी करत किंग्स हरवलं. या खेळीमुळे शिखर धवनने अनेकांना खेळी रुपी चपराक लागवली आहे.

धवनने या सामन्यात ४९ चेंडूमध्ये ९२ धावा करत विजयाला गवसणी घातली. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावे केला. प्रथम पंजाबने फलंदाजी करत दिल्ली समोर १९६ धावांचे आव्हान दिले. परंतु शिखर धवनच्या तडाखेबाज फलंदाजीने सर्वांना शांत केलं. या डावखुऱ्या फलंदाजाने ३१ चेंडूत अर्धशतक केलं आणि त्यानंतर ४९ चेंडूत ९२ धावा ठोकल्या. आठ धावांनी धवनचे शतक हुकले जरी असेल तरी त्याने टीकाकारांचे तोंडं बंद केले आहे. 

गब्बरवर काय होत होती टीका 

टी २० सामन्यात शिखर धवन धिम्या गतीने फलंदाजी करतो, अशी टीका नेहमी त्याच्यावर होत होती. या टीकेमुळे टी २० सामन्यात त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना पंसती दिली जाते. काही दिवसांपुर्वी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी२० सामन्यात धवनला फक्त एका सामन्यासाठी घेण्यात आलं होतं. परंतु शिखर धवनने आयपीएल २०२१ च्या पहिल्या तीन्ही सामन्यात दाखवलं की, तो टी२० सामन्यात खेळण्यास किती परफेक्ट आहे.

आयपीएल २०२१ मध्ये केल्या सर्वाधिक धावा 

शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू बनला आहे. धवनने या हंगामातील ३ सामन्यात १८६ धावा केल्या आहेत. धवनचा सरासरी ६२ आणि स्ट्राइक रेट १६३.१५ आहे. धवनने दोन अर्धशतक केली आहेत. धवनने दोन्ही सामने जिंकवले असून त्याला पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच (Man of the Match) बनवण्यात आले आहे. 

आव्हानाचा पाठलाग करणं धवनच्या आवडीचं 

आयपीएलमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनने सामने जिंकली आहेत शिवाय त्यात अर्धशतकंही केली आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात धवनने १८ अर्धशतके लागावली आहेत. त्याची सरासरी ६३.५१ आहे. शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वात जास्त ५० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ४५ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. यात विराट कोहली पण त्याच्या पाठीमागे आहे.धवननंतर गंभीरने १८ अर्धशतके केली आहेत. तर वॉनर्नने १७ अर्धशतके केली आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी