IPL 2021 SRH vs RCB: दोन्ही संघांचे हे खेळाडू करू शकतात धमाल

IPL 2021
प्रशांत जाधव
Updated Apr 14, 2021 | 14:05 IST

IPL 2021 ।बुधवारी इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League)सहावा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे

ipl 2021 srh vs rcb these players of both teams can create a blast
IPL 2021 SRH vs RCB: दोन्ही संघांचे हे खेळाडू करू शकतात धमाल 

थोडं पण कामाचं

  • बुधवारी इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League)सहावा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे
  • व्हिड वॉर्नर (David Warner) पहिल्याच सामन्यात केकेआरकडून (KKR)पराभूत झाल्यानंतर त्याचा संघ कमबॅक करू इच्छित आहे.
  • बंगळुरूने विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात विजयासह मोहिमेची सुरूवात केली. 

चेन्नई: बुधवारी इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League)सहावा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. या दोघांमध्ये काटें की टक्कर होऊ शकते. दोन्ही संघात एकापेक्षा जास्त धुरंधरांनी भरलेले आहेत. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) पहिल्याच सामन्यात केकेआरकडून (KKR)पराभूत झाल्यानंतर त्याचा संघ कमबॅक करू इच्छित आहे. त्याच वेळी, बंगळुरूने विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात विजयासह मोहिमेची सुरूवात केली. 

सध्या आयपीएलमध्ये दररोज अनेक विक्रम होत आहेत. आज या सामन्यात दोन्ही संघ मैदानावर जाऊन मोठा दणका देणार आहेत. कोण सर्वात भारी असेल हे पाहणे मनोरंजक असेल? अखेरच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलवर सर्वांची नजर असेल.

हे खेळाडू करू शकतात धमाल

विराट कोहली

 आरसीबीचा कर्णधार विराट कोहली एकदा की आक्रमक फलंदाजीला लागला की त्याला रोखणे कठीण होते. कोहलीने गोलंदाजांना हैराण करून सोडतो. अशा परिस्थितीत कोहली विरोधी संघाच्या गोलंदाजांचा  कसा क्लास घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्सच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. डीव्हिलियर्स हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. कर्णधार विराट कोहलीनेही त्याचे कौतुक केले आहे. एबी डिव्हिलियर्स कधीही सामना फिरवू शकतो.

हर्षल पटेल

अखेरच्या सामन्यात मुंबईविरुद्ध पाच विकेट्स घेत हर्षल पटेलने आपल्यातही क्षमता असल्याचे सिद्ध केले. या सामन्यात पुन्हा हर्षल पटेल धमाल  करू शकतो.

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतके लगावणारा फलंदाज आहे. शेवटच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर लवकर बाद झाला होता पण या सामन्यात तो पुनरागमन करू शकतो. डेव्हिड वॉर्नरची बॅट तळपली तर चेन्नईच्या या मैदानात स्फोट होऊ शकतो 

जॉनी बेयस्टरो

इंग्लंडच्या या तुफानी चेंडूकडून हैदराबादला मोठ्या आशा आहेत. आजच्या सामन्यात जॉनी बेयस्टरोही धमाल करू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी