आयपीएलला स्थगिती, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती

IPL 2021
Updated May 04, 2021 | 13:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल स्पर्धेेवरील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएलवर काही काळासाठी स्थगिती आणल्याचे सांगितले.

pollard
आयपीएलला स्थगिती, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती 

थोडं पण कामाचं

  • बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली
  • वृद्धिमन साहा आणि अमित मिश्रा हे दोन खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
  • आयपीएल २०२१वर काही काळासाठी स्थगिती आणण्यात आली आहे.

मुंबई: आयपीएलवरही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. वृद्धिमन साहा आणि अमित मिश्रा हे दोन खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२१वर काही काळासाठी स्थगिती आणण्यात आली आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले, आयपीएलची स्पर्धा सध्या स्थगित करणयात आली आहे. दरम्यान, हे पुन्हा रिशेड्यूल्ड करता येते का हे पाहू. दरम्यान, स्पर्धा रद्द करण्यात आलेली नाही. आतासाठी केवळ ही स्थगित करण्यात आली आहे.

आयपीएलच्या ३ वेगवेगळ्या फ्रंचायझींचे एकूण मिळून ४ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२१मध्ये तात्पुरती स्थगिती देण्याचे बीसीसआयने ठरवल्याची माहिती बीसीसाय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. रिपोर्टनुसार अमित मिश्राही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याआधी कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर वृद्धिमन साहालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

चेन्नई संघातीलही तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

 सीएसकेच्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी आणि बस क्लिनरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू कोरोनाग्रस्त झाल्यानंतर चेन्नईच्या ताफ्यातील या तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. कोलकाता संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा सामना रद्द करण्यात आला होता.

भारतात कोरोनाचा कहर एकीकडे वाढत असताना आयपीेएल २०२१मध्ये हे खेळाडू बायोबबलमध्ये होते. सगळ्या बाजूंनी संरक्षण असताानाही खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्याने बीसीसीआयसमोर आता स्पर्धा सुरू ठेवण्याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, स्पर्धा कायमची स्थगित केलीये की काही काळासाठी यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी