IPL 2021: आज रंगणार RCB विरुद्ध KKR चा सामना, 'या' खेळाडूंकडे असेल प्रेक्षकांच्या नजरा

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 18, 2021 | 12:54 IST

आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या १४ व्या सत्रातील आज १० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (RCB vs KKR) होणार आहे.

IPL 2021 today KKR's against RCB match cricketer's will watch these players
IPL 2021: आज रंगणार RCB विरुद्ध KKR चा सामना  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • आज आरसीबी विजयाची करणार हॅट्रिक
  • कर्णधार कोहलीकडे असणार चाहत्यांच लक्ष
  • पराभवानंतर विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल केकेआरचा

नवी दिल्ली  :  आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या १४ व्या सत्रातील आज १० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (RCB vs KKR) होणार आहे. आरसीबीने या हंगमात एकही सामना गमावलेला नाही. तर केकेआरने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईसोबत झालेला सामना गमावला होता.


कोण-काय करु शकतो या सामन्यात 

विराट कोहली 

आरसीबी(RCB)चा सामना असला तर प्रेक्षकांची नजर कर्णधार (Captian) कोहलीकडे नसेल असे कधी झालेले नाही. विराट जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आरसीबीला पहिला कप मिळववून द्याचा ही जबाबदारी कोहलीच्या खांद्यांवरती आहे. या हंगामात कोहलीचा खेळ चांगला राहिला असून आजच्या सामन्यात कोहली काय करणार याकडे लक्ष असणार आहे. 

आंद्रे रसेल 

मागील दोन हंगामापासून केकेआर(KKR)चा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल फ्लॉप ठरत आहे. पंरतु केकेआरला त्यांच्या उत्कृष्ट खेळाची अपेक्षा आहे, आजच्या सामन्यात तो काहीतरी जादू करेल अशी आशा संघाला आहे.मागील सामन्यात रसेलने ५ गडी बाद केले होते. परंतु फलंदाजीत मात्र विशेष असे काही केले नाही. 

एबी डिविलियर्स 

आरसीबी(RCB)मध्ये कोहलीनंतर कोणाचं नाव येत असेल तर ते नाव आहे, एबी डिविलियर्स. मुंबईविरुद्धात झालेल्या सामन्यात एबीने जोरदार फलंदाजी केली होती. परंतु दुसऱ्या सामन्यात मात्र चांगली कामगिरी करू शकला नाही. एबी डिविलियर्सही आरसीबीला कप मिळवून देण्याची जबाबदारी आहे. 

ग्लेन मॅक्सवेल  

आरसीबीने १४.२५ कोटी रुपये देऊन ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघात घेतलं आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मागील सामन्यात मॅक्सवेलने अर्धशतक केलं. यासाठी त्याला ६ वर्ष वाट पाहावी लागली. आजच्या सामन्यात तो परत दमदार खेळी करेल का याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

नितीश राणा  

या हंगामात नितीश राणाचा दबदबा दिसत आहे. नितीश राणा केकेआरकडून खेळत असून या हंगामातील दोन सामन्यात त्याने १३७ धावा केल्या आहेत. नितीश राणाकडे आयपीएलची २०२१ ऑरेज कॅप आहे. तर आजच्या सामन्यात नितीश राणा परत एकदा दमदार खेळ करेल का असा प्रश्न सर्वांना आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी