आयपीएलच्या टॉप फोर टीम निश्चित

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Oct 09, 2021 | 01:14 IST

आयपीएल २०२१ या स्पर्धेतील टॉप फोर टीम निश्चित झाल्या. तेरा पैकी पाच आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्सची टीम चौदाव्या आयपीएलमध्ये टॉप फोर गटात प्रवेश करू शकली नाही.

IPL 2021 Top Four Finalised, Schedule for Qualifier, Eliminator and Final Match
आयपीएलच्या टॉप फोर टीम निश्चित 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलच्या टॉप फोर टीम निश्चित
  • दिल्ली कॅपिटल्स (पहिल्या स्थानी), चेन्नई सुपरकिंग्स (दुसऱ्या स्थानी), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (तिसऱ्या स्थानी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (चौथ्या स्थानी)
  • रनरेट कमी पडल्यामुळे मुंबईला पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले

दुबईः आयपीएल २०२१ या स्पर्धेतील टॉप फोर टीम निश्चित झाल्या. तेरा पैकी पाच आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्सची टीम चौदाव्या आयपीएलमध्ये टॉप फोर गटात प्रवेश करू शकली नाही. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी राहिली. IPL 2021 Top Four Finalised, Schedule for Qualifier, Eliminator and Final Match

दिल्ली कॅपिटल्स (पहिल्या स्थानी), चेन्नई सुपरकिंग्स (दुसऱ्या स्थानी), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (तिसऱ्या स्थानी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (चौथ्या स्थानी) या टीम चौदाव्या आयपीएलच्या पुढल्या फेरीत दाखल झाल्या. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार टीमचे आव्हान प्ले ऑफ राउंडमध्येच संपले.

प्ले ऑफ राउंडच्या अखेरच्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या मॅचमध्ये मुंबईने ४२ धावांनी विजय मिळवला. पण कोलकाताच्या तुलनेत रनरेट कमी पडल्यामुळे मुंबईला पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये ८४ धावा करणारा मुंबई इंडियन्सचा इशान किशन मॅन ऑफ द मॅच झाला. या मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या मुंबईने वीस ओव्हरमध्ये नऊ बाद २३५ धावा केल्या. हैदराबादने वीस ओव्हरमध्ये आठ बाद १९३ धावा केल्या. 

प्ले ऑफ राउंडच्या अखेरच्या दिवशी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय झाला. बंगळुरूने ही मॅच सात विकेट राखून जिंकली. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला वीस ओव्हरमध्ये पाच बाद १६४ या धावसंख्येवर रोखले. बंगळुरूने धावांचा पाठलाग करताना वीस ओव्हरमध्ये तीन विकेट गमावून १६६ धावा केल्या. बंगळुरूचा विकेटकीपर श्रीकर भारत याने नाबाद ७८ धावा केल्या. तो मॅन ऑफ द मॅच झाला.

चौदाव्या आयपीएलची पहिली क्वालिफायर मॅच १० ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईत होईल. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात लढत होईल. नंतर ११ ऑक्टोबर २०२१ रोजी शारजात एलिमिनेटर मॅच होईल. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होईल. 

पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत टीम आणि एलिमिनेटरमधील विजेती टीम यांच्यात आयपीएलची दुसरी क्वालिफायर मॅच १३ ऑक्टोबर २०२१ रोजी शारजात होईल. पहिल्या आणि दुसऱ्या क्वालिफायरच्या विजेत्यांमध्ये १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईत चौदाव्या आयपीएलची फायनल मॅच रंगणार आहे. नियोजनानुसार १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सर्व मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपित होतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी