आयपीएल २०२१ : विराट सेनेच्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा तिसरा दमदार विजय

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 18, 2021 | 20:06 IST

बंगळुरुच्या विराटसेनेनं कोलकाता नाइटराइडर्सला पराभूत करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह विराटसेना आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे.

IPL 2021: Virat Sena Royal Challengers Bangalores third strong win
विराट सेनेच्या रॉयला चॅलेजर्स बंगळुरुचा तिसरा दमदार विजय   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आयपीएलच्या १० व्या सामन्यात बंगळुरुचा विजय
  • केकेआरसमोर होतं २०५ धावांचं आव्हान
  • केकेआरने २० षटकात केल्या १६६ धावा

नवी दिल्ली :  बंगळुरुच्या विराटसेनेनं कोलकाता नाइटराइडर्सला पराभूत करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह विराटसेना आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे.आयपीएलच्या १४ व्या सत्रातील १० वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (RCB vs KKR) झाला. यात सामन्यात कोलकता समोर बंगळुरुने धावांचा डोंगर उभारत २०५ धावांचं आव्हान ठेवलं, परंतु या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ही धावसंख्या करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले.कोलकात्याने ८ गडी गमवून १६६ धावा केल्या. बंगळुरूच्या फलंदांजासह गोलंदाजांनी आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

 कोलकात्याचे तीन गडी स्वस्तात बाद झाले. शुबमन गिलने ९ चेंडूत २१ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने २० चेंडूत २५ धावा केल्या, तर नितीश राणाने ११ चेंडुत १८ धावा करत तंबूत परतला. शुबमनने आक्रमक खेळी करत २ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र जेमिसनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. कर्णधार ईऑन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांच्यावर आता संघाची बाजू सावरण्याची जबाबदारी आली असताना दिनेश कार्तिकने परत प्रेक्षकांना नाराश करत स्वस्त तंबूत परतला.

अशी होती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी

 ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरुनं कोलकात्यासमोर विजयासाठी २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मॅक्सवेलनं ४८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. तर एबी डिव्हिलियर्सनं ३४ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली. त्यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. बंगळुरुला सुरुवातीला दोन धक्के बसले. कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार झटपट बाद झाले. विराट ५ धावांवर खेळत असताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने ६ चेंडून ५ धावा केल्या त्यात एका चौकाराचा समावेश आहे. तर रजत पाटिदार वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २ चेंडू खेळत केवळ एक धाव केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कल जोडीनं बंगळुरुचा डाव सावरला. मात्र देवदत्त पडिक्कल २५ धावा करुन तंबूत परतला. प्रसिध्द क्रिष्णाच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल जोडीनं संघाच्या धावसंख्येत भर घातली. मॅक्सवेल पॅट कमिन्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हरभजन सिंगच्या हाती झेल देऊन बाद झाला. तिथपर्यंत बंगळुरुने सन्मानजनक धावा केल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी