आयपीएल 2021: Rishabh Pant वर भडकला  Virender Sehwag, कॅप्टनसीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न 

IPL 2021
प्रशांत जाधव
Updated Apr 28, 2021 | 14:20 IST

IPL 2021:  वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, रिषभ पंतला आपल्या कर्णधारपदासाठी 10 पैकी 5 गुणही देणार नाही. कालच रात्री आयपीएलच्या रोमांचक सामन्यात बंगळुरूने दिल्लीला एक रननी पराभूत केले.

ipl 2021 virender sehwag delhi capitals rishabh pant captaincy rcb vs dc
आयपीएल 2021: Rishabh Pant वर भडकला  Virender Sehwag 

थोडं पण कामाचं

  • भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केला आहे
  • , रिषभ पंतला आपल्या कर्णधारपदासाठी 10 पैकी 5 गुणही देणार नाही.
  • आयपीएलच्या थरारक सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सचा एक रनने पराभव केला. 

अहमदाबाद : भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केला आहे. वीरेंद्र सेहवाग म्हणतो की, रिषभ पंतला आपल्या कर्णधारपदासाठी 10 पैकी 5 गुणही देणार नाही.  काल रात्री आयपीएलच्या थरारक सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सचा एक रनने पराभव केला. 

सेहवाग रिषभ पंतवर भडकला 

रिषभ पंतची कॅप्टन्सी पाहून सेहवागने त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.  सेहवाग म्हणाला, 'मी कर्णधारपदासाठी रिषभ पंतला 10 पैकी 5 गुणही देणार नाही. जर अखेरचे षटक तुमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजी करत नसेल तर तुमच्या विचारात काहीतरी गडबड आहे. कर्णधारला सामन्याच्या परिस्थितीनुसार गोलंदाजांचा वापर करावा लागतो.

रिषभ पंत यांचा निर्णय फ्लॉप ठरला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू डावाच्या शेवटच्या षटकात रिषभ पंतने मार्कस स्टोइनिसला गोलंदाजी दिली, जो दिल्ली कॅपिटल्स संघाचा जीवघेणा निर्णय ठरला. त्यावेळी बंगळुरूचा सर्वात धोकादायक फलंदाज एबी डिव्हिलियर्स क्रीजवर होता. डिव्हिलियर्सने स्टॉयनिसवर जोरदार हल्लाबोल करत शानदार खेळी केली आणि 23 धावा ठोकल्या. यानंतर रिषभ पंतच्या कर्णधारपदाविषयी प्रश्न उपस्थित झाले की कागिसो रबाडाच्या सर्व षटक त्याने अगोदरच का व्यर्थ घालवले. 

विजयापासून एक धाव दूर राहिली दिल्ली 

सेहवाग म्हणाला, 'जर रिषभ पंतला चांगला कर्णधार व्हायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पंतचे कर्णधारपदासाठी मी 10 पैकी 3 गुण देतो. शेवटच्या षटकात स्टोइनिसची धुलाई करत बंगळुरूचा 171 धावांपर्यंत मजल मारली.  याचा परिणाम असा झाला की दिल्ली कॅपिटल्स विजयापासून एक धाव दूर राहिली आणि केवळ 170 धावा करू शकले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी