आयपीएल-२०२१ वर कोरोनाचे सावट, आठवडाभरापूर्वी 'वानखेडे'च्या स्टाफचे ८ जण कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2021
Updated Apr 03, 2021 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल-१४ ची (आयपीएल २०२१) सुरूवात ९ एप्रिलपासून होते आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. मात्र अशातच ८ नागरिक कोविड-१९ने बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीसीसीआयवर सर्वांचे लक्ष.

IL 2021 : Wankhede staff corona positive
मुंबईतील आयपीएल २०२१ सामन्यांवर प्रश्नचिन्ह  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वानखेडे स्टेडिअमवरील ग्राऊंड स्टाफपैकी ८ कर्मचारी कोरोना संसर्गाने बाधित
  • १० एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रंगणार
  • आयपीएल लीगच्या मुंबईत होणाऱ्या सामन्यांवर प्रश्नचिन्ह

मुंबई: आयपीएल-१४ ची (आयपीएल २०२१) सुरूवात ९ एप्रिलपासून होते आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. मात्र अशातच ८ नागरिक कोविड-१९ने बाधित असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल,

१. वानखेडे स्टेडिअमच्या ग्राउंडस्टाफपैकी ८ कर्मचारी कोरोना संसर्गाने बाधित
२. आयपीएल २०२१ची सुरूवात ९ एप्रिलपासून
३. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार १० सामने

इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ची सुरूवात होण्याच्या एका आठवडा आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोरील (बीसीसीआय) अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वानखेडे स्टेडिअमवरील ग्राऊंड स्टाफपैकी ८ कर्मचारी कोरोना संसर्गाने बाधित झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईत १० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान १० आयपीएल लीग सामने खेळले जाणार आहेत. १० एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रंगणार आहे.

वानखेडेचे ८ कर्मचारी पॉझिटिव्ह


मागील आठवड्यात वानखेडे स्टेडिअमच्या ग्राऊंड स्टाफची आरटी-पीसीआर टेस्ट आली होती. यात ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ६ मार्चला झालेल्या चाचणीत या ८ पैकी ३ कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर १ एप्रिलला पुन्हा चाचण्या केल्या गेल्या. यात आणखी कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित ग्राऊंड स्टाफचे विलगीकरण करण्यात आले आहे की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयपीएल २०२१चे सामने सुरू होण्यास एक आठवड्ययाचा कालावधी शिल्लक राहिला असताना आता बीसीसीआय काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयसमोर आव्हाने


मुंबई क्रिकेट असोसिएशन कदाचित कांदिवलीचा सचिन तेंडुलकर जिमखाना आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे शरद पवार अकॅडमीमधून ग्राऊंड्समन बोलावू शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयला आयपीएलच्या मुंबईतील आयोजनाबद्दल पुनर्विचारदेखील करावा लागू शकतो. महाराष्ट्र मागील काही आठवड्यात कोविड-१९च्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. अशा परिस्थितीत आयपीएल लीगच्या मुंबईत होणाऱ्या सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कदाचित हे सामने बंद दरवाज्याआठदेखील खेळवले जाऊ शकतात.

६० सामन्यांचे आयोजन


महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक निर्बंध लागू केले आहेत. चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता आणि बंगळूरू ही इतर पाच ठिकाणं आहेत जिथे आयपीएलच्या सामने खेळले जाणार आहेत. मागील वर्षीदेखील भारतात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने आयपीएलचे सामने 'युएई'मध्ये खेळवण्यात आले होते. आयपीएल २०२१मध्ये एकूण ६० सामने खेळले जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना ३० मे ला खेळला जाणार आहे. 

अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह


दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज खेळाडू अक्षर पटेल यादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अक्षर पटेल आयपीएलचे सामने खेळू शकणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. याआधी भारतरत्न सचिन तेंडुलकरदेखील कोविड-१९ पॉझिटिव्ह झाला आहे. मागील आठवड्यातच सचिनला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर सचिन मुंबईतील इस्पितळात दाखल झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी