IPL 2022: दिनेश कार्तिकची फटकेबाजी पाहून डु प्‍लेसीला व्हायचं होतं रिटायर्ड आउट, SRH शी होणाऱ्या सामन्यात घडली ही घटना

IPL 2022
भरत जाधव
Updated May 10, 2022 | 18:50 IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार (Captain) फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) खेळीवर फिदा झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) (SRH) विरुद्ध 8 मे रोजी खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसला निवृत्त (रिटायर्ड आउट) व्हायचे होते.

Du Plessis was going to retire after seeing Karthik's shot
कार्तिकची फटकेबाजी पाहून डु प्‍लेसी होणार होता रिटायर्ड आउट  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 30 धावांची किलर इनिंग खेळली.
  • 8 मे रोजी खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसला रिटायर्ड आउट व्हायचे होते.
  • रजत पाटीदार 48 धावांवर बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल क्रीझवर आला.

IPL 2022:  नवी दिल्ली :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार (Captain) फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) खेळीवर फिदा झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) (SRH) विरुद्ध 8 मे रोजी खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसला निवृत्त (रिटायर्ड आउट) व्हायचे होते. त्याचं कारण आहे, त्याच्या संघातील स्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा 67 धावांनी पराभव केला.

बंगळुरूने हा सामना 67 धावांनी जिंकला

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या. त्याच वेळी, दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 30 धावांची किलर इनिंग खेळली, ज्यात 1 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

कार्तिकमुळे डु प्लेसिसला निवृत्ती घ्यायची होती 

फाफ डू प्लेसिसने सांगितले की, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात तो खूप थकला होता आणि दिनेश कार्तिकला क्रीझवर आणण्यासाठी त्याला स्वतःला निवृत्त करायचे होते. फाफ डू प्लेसिसने कबूल केले की दिनेश कार्तिकसारखा स्फोटक फलंदाज ज्या सफाईदारपणे मोठे षटकार मारतो, ते पाहून त्याला लवकरात लवकर क्रीजवर आणायचे होते.

कार्तिकने 8 चेंडूत 30 धावा ठोकल्या

या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला, त्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी झाली. रजत पाटीदार 48 धावांवर बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल क्रीझवर आला. 24 चेंडूत 33 धावांची संथ खेळी केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलनंतर कार्तिकने मैदानात उतरला आणि त्याने अवघ्या 8 चेंडूत 30 धावा ठोकल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी