IPL 2022 Final : फायनलचा थरार आज; कधी, कुठे पाहाल, गुजरात- राजस्थान यांच्यातील अंतिम सामना

IPL 2022
भरत जाधव
Updated May 29, 2022 | 07:58 IST

आयपीएलच्या (IPL) 15व्या मोसमाची मेगा फायनल (mega final)रविवारी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचलेला राजस्थान रॉयल्स संघ (Rajasthan Royals) यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे.

 Rajasthan Or Gujrat Team will win in the final of IPL 2022
IPL 2022 च्या अंतिम लढतीत गुजरात जिंकणार की राजस्थान  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • राजस्थान रॉयल्स संघ 14 वर्षानंतर पोहचला अंतिम फेरीत
  • अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना खेळला जाणार आहे.
  • गुजरातचा संघ पदार्पणातच फायनल गाठल्यानं यंदाच्या मोसमातला हा संघ सर्वात यशस्वी संघ ठरला.

IPL 2022 Final : आयपीएलच्या (IPL) 15व्या मोसमाची मेगा फायनल (mega final)रविवारी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि 14 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचलेला राजस्थान रॉयल्स संघ (Rajasthan Royals) यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. क्रिकेट प्रेमींना आणि गुजरातच्या चाहत्यांना गारवा खेळण्यास मिळणार का राजस्थानचा रॉयल विजय अनुभवयाला मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना  कुठे पाहता येणार आहे? हे आधी जाणून घ्या. 

लाईव्ह सामना कधी, कुठे पाहता येणार?

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज आयपीएल 2022 मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरूवात होईल. त्याआधी अर्धातास म्हणजेच साडेसात वाजता नाणेफेक होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. गुजरात- राजस्थान यांच्यातील स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. 

गुजरातचा संघ पदार्पणातच फायनल गाठल्यानं यंदाच्या मोसमातला हा संघ सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या अंतिम सामन्यात घेऊन आलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.  हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत 14 पैकी 10 सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचे पारडं जड मानले जात आहे.

तर दुसरीकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. पण यंदाच्या स्पर्धेत चार शतकं ठोकणारा जॉस बटलर, कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेला संजू सॅमसन, यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल हे युवा शिलेदार आणि युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेन्ट बोल्ट ही गोलंदाजांची फळीमुळे राजस्थान रॉयल्सची बाजूही दमदार मानली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी