IPL 2022: तेवतियानं गुजरातला तारलं; शेवटच्या दोन चेंडूत फिरला सामना, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय

IPL 2022
भरत जाधव
Updated Apr 09, 2022 | 07:31 IST

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातने पंजाबला 6 विकेट्सने पराभूत केले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेरच्या दोन चेंडूंमध्ये फिरला. गुजरातला अखेरच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने अनपेक्षितपणे सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकला.

gujrat titans won the match by 6 wickets
गुजरातचा 6 विकेट्सनं विजय  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पंजाबने गुजरात समोर 190 धावांचे लक्ष्य ठेवलं.
  • गुजरातकडून राशिद खाननं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या.

PBKS vs GT IPL 2022: मुंबई:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातने पंजाबला 6 विकेट्सने पराभूत केले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेरच्या दोन चेंडूंमध्ये फिरला. गुजरातला अखेरच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने अनपेक्षितपणे सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकला. गुजरात संघाच्या हातातून विजय गेला असल्याचं दिसत असतानाच अत्यंत आश्चर्याकारकपणे गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. पंजाबने दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोनंही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, शिखर धवनने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. पंजाबने दोन विकेट्स गमवल्यानंतर मैदानात आलेल्या लियान लिव्हिंगस्टोनने आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोर पुढे नेला. परंतु, दहाव्या षटकात राशीद खाननं शिखर धवनला बाद केलं. 

या सामन्यात ओडियन स्मिथ मोठी धावसंख्या उभी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर सोळाव्या षटकात राशिद खानं लिव्हिंगस्टोनची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. अखेरच्या दोन षटकात फलंदाजी करत राहुल चहरनं 14 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. तर, अर्शदीप सिंहनं पाच चेंडूत दहा धावा केल्या. ज्यामुळे पंजाबने गुजरात समोर 190 धावांचे लक्ष्य ठेवलं. गुजरातकडून राशिद खाननं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. तर, दर्शन नालकांडेनं दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी, हार्दिक पांड्या, लॉकी फॅर्ग्युसन यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स प्राप्त झाल्या. २० षटकात ९ बाद १८९ धावा केल्या. यानंतर गुजरातने ६ विकेट राखत अखेरच्या २ चेंडूवर षटकार लगावत १९० धावा केल्या आणि सामना आपल्या खिशात टाकला.

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातच्या संघाने चौथ्याच षटकात त्यांचा पहिली विकेट्स गमावली. मात्र, त्यानंतर सलामीवीर शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. दरम्यान, साई सुधरसननं त्याला चांगली साथ दिली. मात्र, पंधराव्या षटकात राहुल चहरनं साई सुधरसनच्या रुपात गुजरातला दुसरा झटका दिला. त्यानंतर शुभमन गिलनेही आपली विकेट्स गमावली. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आली. परंतु, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिकला रनआऊट करून पंजाबने जोरदार कमबॅक केलं. पाच चेंडूत 18 धावांची गरज असताना राहुल तेवतिया मैदानात आला. हा सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना त्यानं अखेरच्या चेंडूत 13 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. 

गुजरातची फलंदाजी 

गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने ५९ चेंडूत तुफान फटकेबाजी करत ९६ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० चेंडूत ३५ धावा, तर हार्दिक पंड्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. मॅथ्यू वेडने ७ चेंडूत ६ धावा केल्या. हा सामना गुजरातच्या खिशात घालण्यात जेवढी मोठी भूमिका शुभमन गिलची राहिली तेवढीच मोठी भूमिका अखेरच्या दोन चेंडूत सामना फिरवणाऱ्या राहुल तेवतियाची राहिली. राहुलने अखेरच्या दोन चेंडूत १२ धावा लागत असताना तुफान फटकेबाजी करत सलग दोन षटकार मारले. 

पंजाबची फलंदाजी

मयांक अग्रवाल ९ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पंड्याने बाद केलं. जॉनी बेयरस्टोने ८ चेंडूत ८ धावा केल्या. त्याला लोकी फर्गसनने बाद केलं. पंजाबला तिसरा झटका शिखर धवनच्या रुपात मिळाला. शिखर धवनने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. त्याला रशिद खानने बाद केलं. लियाम लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. जितेश शर्माने ११ चेंडूत २३ धावांची खेळी केली. ओडेन स्मिथला तर आपलं खातही खोलता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर तंबुत परतला. शाहरुख खानने ८ चेंडूत १५ धावा काढल्या. रबाडालाही एकच धाव करता आली, तर वैभव अरोराने २ धावा केल्या. राहुल चहर आणि अर्शदीप सिंह नाबाद राहिले. चहरने १४ चेंडूत २२ धावा, तर अर्शदीपने ५ चेंडूत १० धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी