मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या(indian premier league) हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा(kolkata knight riders) खेळाडू रिंकू सिंहने धमाल केली. दरम्यान केकेआरला आपल्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्करून स्पर्धेबाहेर जावे लागले. दरम्यान, या सामन्यात केकेआरच्या रिंकू सिंहने(rinku singh) या सामन्यात आपला जलवा दाखवला. बुधवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाताला २ धावांनी हरवले. या सामन्यात रिंकू सिंहने १५ बॉलवर ताबडतोब धावा करत ४० धावा केल्या. मात्र त्याची ही खेळी केकेआरला जिंकून देऊ शकली नाही. IPL 2022: Know all about KKR player rinku singh
अधिक वाचा - ओबीसी आरक्षणावर जूनमध्ये बोलू - अजित पवार
रिंकूने आपल्या या खेळीदरम्यान ४ सिक्स आणि २ फोर मारले. उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये राहणाऱ्या रिंकू सिंहने आपल्या जीवनात खूप आर्थिक चढ-उतार पाहिले. आयपीएल स्टार बनण्यापर्यंत त्याचा हा प्रवास काही सोपा नव्हता. रिंकू सिंह ५ भावा-बहिणींमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर डिलीव्हरीचे काम करत होते. तर त्याचा भाऊ ऑटो चालवत होता.
१२ ऑक्टोबर १९९७ला यूपीच्या अलिगढमध्ये जन्मलेल्या रिंकू सिंहचा क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नामुळे आर्थिक दबावाखाली राहत होते. एकवेळ रिंकू सिंहने नोकरीचा निर्णय घेतला होता मात्र तो कमी शिकलेला असल्यामुळे त्याला साफसफाईचे काम मिळाले होते.
साफसफाईचे काम करणे रिंकू सिंहला आवडत नव्हते आणि त्याने नोकरी सोडून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे ठरवले. क्रिकेट खेळल्यामुळे रिंकूचे वडील त्याची चांगलीच धुलाई करत होते. मात्र दिल्लीमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याला मॅन ऑफ दी सीरिजमध्ये बाईक मिळाली होती. यानंतर वडिलांनी त्याला मारणे बंद केले होते.
अधिक वाचा - मिर्झापूरच्या डिम्पीचा बोल्ड लूक
रिंकूची ही मेहनत २०१४मध्ये फळाला आली. त्याला २०१४मध्ये उत्तर प्रदेशकडून लिस्ट एआणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनी रिंकूने पंजाबविरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. रिंकू सिंहने आतापर्यंत ३० फर्स्ट क्लास सामन्यात ५ शतक आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने २३०७ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०१७च्या लिलावात रिंकूला किंग्स इलेव्हन पंजाबने १० लाखांना खरेदी केले होते. मात्र त्या हंगामात केवळ एकच सामना खेळायची संधी मिळाली. २०१८च्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. आयपीएल २०२२च्या लिलावा रिंकू सिंहला केकेआरने ५५ लाखांना खरेदी केले होते.
२०१९मझ्ये रिंकू सिंहवर बीसीसीआयने तीन महिन्यांची बंदी घातली होती. त्यादरम्यान रिंकू सिंहने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय अबुधाबी क्रिकेटच्या रमजान टी-२० कपमध्ये भाग घेतला होता.