Ipl 2022 news in marathi । लखनऊ : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये प्रथमच भाग घेत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सने सोमवारी एक नवीन घोषणा केली आहे. त्याचा लोगो लखनऊ संघाने जारी केला आहे, ट्विटर अकाऊंटवर संध्याकाळी 5 वाजता हा लोगो रिलीज झाला. लोगोमध्ये बॅटसह पंख ही आहेत आणि मध्यभागी संघाचे नाव लिहिलेले आहे. तो ट्विटरवर एका व्हिडिओद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्याचे हेडिंग आहे. "महानतेकडे उड्डाण घेताना ." लखनऊ सुपर जायंट्स आपले पंख फैलावण्यासाठी तयार आहेत.
Soaring towards greatness. 💪🏼 — Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 31, 2022
Lucknow Super Giants is all set to stretch its wings. 🔥
Prepare for greatness! 👊🏼#LucknowSuperGiants #IPL pic.twitter.com/kqmkyZX6Yi
अधिक वाचा : फिटनेस टेस्टमध्ये झाला होता फेल, संघातून बाहेर आहे हा खेळाडू
लखनऊ सुपर जायंट्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा संघ आहे, ज्याला आरपी संजीव गोएंका ग्रुपने 7090 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. लखनऊने केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मेगा लिलावापूर्वी केएल राहुलला 17 कोटींमध्ये करारबद्ध केले आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस (9.5 कोटी) आणि पंजाबचा रवी बिश्नोई (4 कोटी) यांना 17 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. लखनऊ संघाने टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर गौतम गंभीरला आपला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे, तर झिम्बाब्वेचा माजी खेळाडू अँडी फ्लॉवर संघाचा प्रशिक्षक बनला आहे.
अधिक वाचा : विराट कोहलीने का सोडले होते कर्णधारपद, आता केलाय खुलासा
विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये १० संघाचा समावेश होणार आहे. जुन्या आठ संघांसह यंदा आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये 12-13 तारखेला बेंगळुरूमध्ये मेगा लिलाव होणार आहे., त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने खेळाडूंना बोली लागणार आहे.