Matthew Wed IPL | मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या चौथ्या सामन्यांत गुजरात टायटन्सच्या संघासमोर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ राहिला. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले होते. कारण हे दोन्हीही संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत. मात्र लक्षणीय बाब म्हणजे या सामन्यापेक्षा क्रिकेट चाहत्यांचे लक्ष एका अशा खेळाडूकडे होते, जो ११ वर्षानंतर आयपीएलच्या रणसंग्रामात उतरला आहे. (IPL 2022 Matthew Wade returns to IPL after 11 years).
अधिक वाचा : नाणार प्रकल्प रत्नागिरीतच पण..., सीएमचं थेट पीएमला पत्र
आयपीएल २०२२ मध्ये एका अशा खेळाडूचे पुनरागमन झाले आहे, जो या लीगमध्ये तब्बल ११ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर परतला आहे. हा खेळाडू गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. आपण ज्या खेळाडूबाबत चर्चा करत आहोत तो खेळाडू म्हणजे गुजरातच्या संघाचा स्टार विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेड. लक्षणीय बाब म्हणजे मॅथ्यू वेडने लखनऊ सुपर जायंट्सविरूध्द तब्बल ११ वर्षांनंतर प्रथमच आयपीएल सामना खेळला. या सामन्यात वेडने ४ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
वेड शेवटच्या वेळी २०११ मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर हा खेळाडू एका दशकाहून अधिक काळ या लीगमध्ये उतरला नाही. तो हंगाम त्याच्यासाठी फारसा खास नव्हता आणि तो फक्त ३ सामने खेळू शकला. यादरम्यान त्याने २२ धावा केल्या. पण आता वेड पूर्वीसारखा फलंदाज राहिलेला नाही. वेड आता खूप घातक फलंदाज बनला आहे आणि अलीकडेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
अधिक वाचा : संजय राऊत अन् वरुण गांधींच्या डिनरमुळे भाजपच्या गोटात गडबडी
यावेळीच्या मेगा लिलावात मॅथ्यू वेडला खूप मागणी होती आणि गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने मॅथ्यू वेडला २ कोटी ४० लाख रुपयांना आपल्या संघामध्ये सामाविष्ट केले. आयपीएलची ही मोठी डील होताच, अचानक मॅथ्यू वेडने इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटला निरोप दिला. मॅथ्यू वेड हा इंग्लंडच्या देशांतर्गत स्पर्धा काउंटी क्रिकेटमध्ये वोस्टरशायर क्लबकडून खेळला. मॅथ्यू वेड दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये खेळत आहे. यापूर्वी तो २०११ च्या हंगामात आयपीएल खेळला होता. त्यानंतर मॅथ्यू वेड दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून क्रिकेट खेळला. त्यानंतर दिल्लीचे कर्णधारपद वीरेंद्र सेहवागकडे गेले.
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० विश्वचषक विजयात मॅथ्यू वेडचा मोठा वाटा होता. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेडने सलग तीन षटकार लगावून ऑस्ट्रेलियाला हरलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला. खरं तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३० चेंडूत ६२ धावांची गरज होती. वेडने शाहीन शाह आफ्रिदीच्या १९ व्या षटकात लागोपाठ तीन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा आरामात पराभव केला आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले.