IPL 2022 MI vs RCB: अनुज रावतच्या अर्धशतकाने बंगळुरूने मारली बाजी, मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated Apr 10, 2022 | 07:52 IST

MI vs RCB IPL 2022: अनुज रावतच्या अर्धशतकामुळे मुंबईने बंगळुरूला हरवले. मुंबईला सलग चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

IPL 2022 MI vs RCB: Bangalore beat Anuj Rawat's half-century, Mumbai Indians lose for the fourth time in a row
IPL 2022 MI vs RCB: अनुज रावतच्या अर्धशतकाने बंगळुरूने मारली बाजी, मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला
  • 152 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात संथ झाली.
  • अनुज रावतने आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले.

मुंबई : आयपीएल 15 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. हा सामना बेंगळुरूने जिंकला आहे. आयपीएलमधील मुंबईचा हा सलग चौथा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच सामना होता, जेव्हा मुंबईचा संघ केवळ दोन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला होता. (IPL 2022 MI vs RCB: Bangalore beat Anuj Rawat's half-century, Mumbai Indians lose for the fourth time in a row)

अधिक वाचा : IPL 2022: चाहत्यांकडून BCCI ला मोठा झटका; दिवसेंदिवस IPL च्या रेटिंगमध्ये होतेय घट 

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पॉवरप्लेमध्ये बिनबाद 49 धावा केल्यानंतर संघ सुस्थितीत होता, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. 50 धावांची भागीदारी. पहिला धक्का 7व्या षटकात रोहित शर्माच्या रूपाने आला. दुसरा धक्का 9व्या षटकात बसला. वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर डेव्हाल्ड ब्रेव्हिस 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 10व्या षटकात आकाशदीपने इशान किशनला पॅव्हेलियनमध्ये पाठवून संघाला अडचणीत आणले. त्याच षटकात टिळक वर्मा धावबाद झाला. यानंतर किरॉन पोलार्ड बाद झाला आणि संघाची धावसंख्या 10.1 षटकांत 5 बाद 62 अशी झाली. पहिला सामना खेळणारा रमणदीप सिंग सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 68 धावा केल्या. जयदेव उनाडकट 13 धावांवर नाबाद राहिला.

अधिक वाचा :  ​T20 Cricket: शिखर धवनने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, असे करणारा बनला पहिला भारतीय 

बंगळुरूची सुरुवात संथ झाली. पॉवरप्लेमध्ये 6 षटकांत फक्त 30 धावा झाल्या, पण विकेट पडली नाही. आठव्या षटकात 50 धावा पूर्ण झाल्या. पुढच्याच षटकात डू प्लेसिसला जयदेव उनाडकटने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अनुज रावत ६६ धावा करून धावबाद झाला. डेव्हाल्ड ब्रेव्हिसने विराट कोहलीला 48 धावांवर पॅव्हेलियन पाठवले. यानंतर मॅक्सवेलने दोन चेंडूंत दोन चौकार मारून विजय मिळवून दिला. मॅक्सवेल 8 आणि दिनेश कार्तिक 7 धावांवर नाबाद राहिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी