IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या हाती ४ संघाचे नशीब ठरणार

IPL 2022
Updated May 17, 2022 | 16:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

mumbai indians: इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या हंगामात आतापर्यंत केवळ गुजरात टायटन्स या संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली आहे. विराट कोहलीच्या आरसीबीचे नशीब मुंबई इंडियन्सच्या हाती आहे. 

ipl 2022
IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या हाती ४ संघाचे नशीब ठरणार 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलमध्ये प्लेऑफच्या लढती रोमहर्षक
  • मुंबई इंडियन्सवर आरसीबीचे नशीब अवलंबून

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(ipl 2022)मधील प्लेऑफची शर्यत कायम आहे. पंजाब किंग्सविरुद्ध(PBKS) दिल्ली कॅपिटल्सच्या(DC) विजयाने ही लढत अधिकच रोमहर्षक बनवली आहे. येथे १३ सामन्यांत त्यांचे २० गुणांसह गुजरात टायटन्सने(gujrat titans) प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे. IPL 2022: mumbai indians will decide 4 teams play off equation

अधिक वाचा - पार्टीत कंगना झाली या व्यक्तीवर फिदा, सर्वांसमोरच केला किस

मुंबई इंडियन्स भले प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे मात्र त्याच्या हाती आरसीबीसह चार संघांचे नशीब अवलंबून आह. जर मुंबई २१मेला आपल्या शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवेल तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. मात्र यासाठी आरसीबीला आपल्या शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सला हरवावे लागेल. 

जर दिल्लीने मुंबईला हरवले तर आरसीबीचे प्लेऑफमध्ये पोहोचणे मुश्किल होईल कारण गुजरातविरुद्ध विजयानंतर त्यांचे गुण १६ होतील मात्र नेट रनरेटच्या बाबतीत ते लखनऊ आणि दिल्ली मागे सोडणे मुश्किल होईल. 

आयपीएलमधील प्लेऑफची समीकरणे

लखनऊ सुपर जायंट्स - लखनऊ सुपर जायंट्सचे सध्या १६ गुण आहेत मात्र त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित नाही. हा संघ शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल हाजिंकून ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. संघाचा रनरेट  +0.262 आहे. 

दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली कॅपिटल्सच १३ सामन्यांत १४ गुण आहे. दिल्लीलाआता मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे त्यांचे १६ अंक होतीलआणि प्लेऑफचा दावा मजबूत होईल. दिल्लीचा रनरेट ०.२५५ आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - आरसीबीचे सध्या १३ सामन्यानंतर १४ गुण आहेत. १४ गुणांसह टीम प्लेऑफच्या शर्यतीत आहे मात्र रनरेट खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा रनरेट मायनसमध्ये आहे. आरसीबीचा रनरेट सध्या -0.323  आहे. 

राजस्थान रॉयल्स - राजस्थान रॉयल्सने १३ सामन्यांत १६ गुण मिळवले आहेत मात्र त्यांना प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय महत्त्वाचा आहे. जर ते पुढील सामन्यात पराभव पत्करतील तरीही नेट रनरेट महत्त्वाची भूमिका निभावेल. त्यांचा नेट रनरेट +0.304 आहे. 

अधिक वाचा - घटस्फोटानंतर असा होता बॉलिवूड कलाकारांचा पहिला लूक

कोलकाता नाईट रायडर्स- कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या १३ सामन्यांत १२ अंक आहेत. या संघाला आपल्या शेवटच्या सामन्यतत लखनऊ सुपर जायंट्सचा सामना करायचा आहे. दरम्यान, या सामन्यातील विजयानंतरही केकेआरला अन्य संघांवर अवलंबून राहावे लागेल. संघाचा रनरेट +0.160 आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी