आयपीएल 2022 : फ्लॉप फलंदाजीमुळे पंजाब 'किंग्स'चा 20 धावांनी पराभव; लखनौ संघाचा 6 वा विजय

IPL 2022
भरत जाधव
Updated Apr 30, 2022 | 00:50 IST

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये 42 वा सामना  पुण्याच्या (Pune) एमसीए मैदानावर (MCA ground) झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव केला.

IPL 2022 - 6th victory celebrated by Nawabs of Lucknow
आयपीएल 2022 - लखनौच्या नवाबांनी साजरा केला 6 वा विजय  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पंजाबचा संघ 20 षटकांत 133 धावांपर्यंत पोहचू शकला.
  • लखनौकडून युवा मोहसीन खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
  • केएलच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत केवळ 3 सामने गमावले आहेत.

नवी दिल्ली : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये 42 वा सामना  पुण्याच्या (Pune) एमसीए मैदानावर (MCA ground) झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. लखनौने दिलेले 154 धावांचे आव्हान पार करताना पंजाबचा संघ 20 षटकांत 133 धावांपर्यंत पोहचू शकला. जॉनी बेयस्टोचा अपवाद वगळता पंजाबच्या एकाही फलंदाला 30 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत. लखनौकडून युवा मोहसीन खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लखनौचा हा 9 सामन्यांमधला सहावा विजय आहे. केएलच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत केवळ 3 सामने गमावले आहेत. त्याचबरोबर पंजाबचा 9 सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. पीबीकेएसने आतापर्यंत केवळ 4 सामने जिंकले आहेत.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. 20 षटकांत 8 गडी गमावून 153 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 46 धावा केल्या, तर दीपक हुडाने 34 धावा केल्या. फॉर्ममध्ये असलेला राहुल अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. त्यानंतर डिकॉक आणि दीपक हुडा यांनी डाव सावरला. पण दीपक हुडा 34 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर लखनौचे फलंदाज एकामोगाम एक बाद होत गेले. क्रृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, आयुष बडोनी यांना दहा धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तर जेसन होल्डर 1 आणि चामिरा 17 जम बसल्यानंतर माघारी परतले. पंजाबकडून राबाडाने चार विकेट घेतल्या. तर राहुल चाहर याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. संदीप शर्माला एक विकेट मिळाली.

Read Also : 2050 मध्ये लोकांच्या हातात पैसा असेल पण पोटात नसेल अन्न

153 धावांचा बचाव करताना लखनौच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. लखनौच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी ढेपाळली. कर्णधार मयांक अग्रवाल 25 आणि जॉनी बेयस्टो 32 यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश मिळाले नाही. शिखर धवन 5, भानुका राजपक्षे 9, लियाम लिव्हिंगस्टोन 18, जितेश शर्मा 2, रबाडा 2, राहुल चाहर 4 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अष्टपैलू ऋषी धवन याने अखरेच्या षटकात फटकेबाजी करत 21 धावांची खेळी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Read Also : राज्यात प्रथम येणाऱ्या चौगुलेचं पप्पा आहेत टेम्पो चालक

लखनौकडून मोहसीन खान सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय दुष्मंता चामिरा आणि क्रृणाल पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. रवी बिश्नोईला एक विकेट मिळाली. दरम्यान, कगिसो रबाडा आणि राहुल चाहरच्या माऱ्यापुढे बलाढ्य लखनौची भंबेरी उडाली. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे लखनौने निर्धारित 20 षटकात आठ बाद 153  धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉक याने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून कगिसो रबाडाने चार गड्यांना तंबूत पाठवले.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी