IPL 2022: विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कर्णधार; भारतीय संघाच्या या खेळाडूचा दावा

IPL 2022
Updated Mar 23, 2022 | 17:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli IPL 2022 | आयपीएलचा थरार सुरू होण्यासाठी आता केवळ ३ दिवसांचा कालावधी उरला आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स असा असणार आहे. या हंगामाच्या पूर्वसंध्येला काही संघाच्या कर्णधारांमध्ये बदल करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ देखील एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात असणार आहे.

 IPL 2022 Virat Kohli will have been RCB captain again says Ravichandran Ashwin
विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कर्णधार, या खेळाडूचा दावा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएलचा थरार सुरू होण्यासाठी आता केवळ ३ दिवसांचा कालावधी उरला आहे.
  • या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स असा असणार आहे.
  • विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कर्णधार - रवीचंद्रन अश्विन.

Virat Kohli IPL 2022 | मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान यावेळीचा आयपीएलचा हंगाम खूप खास असणार आहे, कारण आगामी हंगामात एकूण १० संघ मैदानात असणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलचा थरार सुरू होण्यासाठी आता केवळ ३ दिवसांचा कालावधी उरला आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स असा असणार आहे. या हंगामाच्या पूर्वसंध्येला काही संघाच्या कर्णधारांमध्ये बदल करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ देखील एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात असणार आहे. (IPL 2022 Virat Kohli will have been RCB captain again says Ravichandran Ashwin).

अधिक वाचा : मुंबई-चेन्नई २-२ सामने खेळणार, तर फक्त MI-RCB एकच का?

मागील काही वर्ष आरसीबीच्या संघाचा कर्णधार विराट कोहली होता. मात्र कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघाला एकदाही आयपीएलचा किताब जिंकता आला नाही. गतवर्षीच्या आयपीएल हंगामादरम्यानच विराटने हा आपला कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आगामी हंगामासाठी फाफ डू प्लेसिसची आरसीबीच्या कर्णधारपदी वर्णी लागली आहे.

दरम्यान, आरसीबीच्या फ्रँचायझीने डू प्लेसिसला ८ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले आहे. आरसीबीचा पहिला सामना २७ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरूध्द होणार आहे. मात्र आयपीएलच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू रवीचंद्रन अश्विनने आरसीबीच्या कर्णधारपदावरून एक मोठे वक्तव्य केले आहे. 

आयपीएलच्या १५ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या आर अश्विनने विराट कोहली हा पुढील हंगामात आरसीबीच्या संघाचा कर्णधार होऊ शकतो असा दावा केला आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, सध्या आरसीबीचा कर्णधार असलेल्या डू प्लेसिसच आयपीएल करिअर शेवटच्या टप्प्यात आहे. तो आणखी दोन किंवा तीन हंगाम खेळू शकतो. आरसीबीच्या संघाने त्याला कर्णधार करून चांगला निर्णय घेतला आहे. डू प्लेसिस हा एक अनुभवी खेळाडू आहे. तसेच त्याच्या कर्णधार पद सांभाळण्याच्या शैलीवर एम.एस धोनीचा प्रभाव असल्याचे त्यानेच मान्य केले आहे."

अधिक वाचा : मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग

"विराटने मागील एक वर्षापासून खूप तणाव सहन केला आहे म्हणूनच या एका वर्षात तो तणावापासून लांब राहत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पुढच्या वर्षी पुन्हा एकदा त्याला कर्णधार बनवू शकतो. असा माझा अंदाज आहे." 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी