नवी दिल्ली: कोणाचं नशीब कधी पलटणार हे कधीच सांगता येत नाही. सुरुवातीला हलाकीचे दिवस काढल्यानंतर आता अलीशान जीवन जगणारे अनेक खेळाडू आपण पाहिले आहेत. सघ्या चालू असलेल्या आयपीएलमध्येही असेच काही खेळाडू आहेत जे आधी खूप गरिबीमध्ये दिवस काढत होते, पण ते आता करोडो रुपये कमावत आहेत. आज अशाच एका खेळाडूविषयी जाणून घेणार आहोत, ज्याची कहाणी ऐकून दुख वाटेल पण स्टोरी वाचल्यानंतर आनंदही होईल.
आपण बोलत आहोत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या हर्षल पटेलविषयी. मागील हंगामात हर्षल पटेलला बंगळुरू संघाने रिलीज केलं होतं. चांगली कामगिरी करुनही त्याला रिलीज केल्यानं सर्वजण आरसीबीच्या या निर्णयावर आवक झाले होते. मागील हंगामात त्याने 32 गडी बाद केले होते, अन् त्याला आरसीबीने अगदी बेस सॅलरीमध्ये म्हणजेच 20 लाख रुपयात घेतलं होतं. परंतु या आयपीएल 2022 च्या लिलावात आरसीबीने त्याला जोरदार दाम देत आपल्या संघात घेतलं आहे आणि तो त्याप्रकारे कामगिरी देखील करत आहे. लिलावात आरसीबीने त्याला चक्क 10.57 कोटी रुपयांना खरेदी केलं. म्हणजेच आधीच्यापेमेंटपेक्षा 50 पटीने जास्त पैसा त्याला मिळाला आहे.
तुम्ही हर्षलची कमाई किंवा त्याला मिळालेल्या प्राईज पाहून चक्रावले असाल तर थोडं थांबा. कारण हर्षल आधीपासून इतका लकी नव्हता. त्याला 1500 रुपयांसाठी 12-12 तास दुकानात काम करावं लागत होतं. तेही अमेरिकेसारख्या देशात. पटेलला आपल्या करिअरमध्ये खूप रिजेक्शन आले आहेत. एकदा तर त्याला आयपीएलमध्ये घरी पाठवण्यात आलं होतं. परंतु आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी झगडत हर्षलने यश मिळवत चॅम्पियन बनला आहे.
'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये हर्षल पटेलने त्याच्या आयुष्याशी संबंधित या अनपेक्षित पैलूंबद्दल खुलेपणाने सांगितले. त्याचे कुटुंब अमेरिकेत कसे गेले आणि पाकिस्तानी दुकानदाराच्या परफ्यूमच्या दुकानात कसे काम करायचे हे त्याने सांगितले. आज करोडो रुपये घेणाऱ्या पटेलला 14 वर्षांपूर्वी दररोज 35 डॉलर म्हणजेच 1500 रुपये मिळत होते. हा पैसा अमेरिकेत टिकण्यासाठी खूपच कमी होता. मात्र या प्रसंगांनाही न घाबरता तो तेथे लढत राहिला.
हर्षल 2017 मध्ये आरसीबीसोबत होता. मग एके दिवशी संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये असलेल्या डॅनियल व्हिटोरीने त्याला फोन केला आणि सांगितले की तो पुढील 4-5 सामने खेळणार नाही. जेव्हा संघाला त्याची गरज असेल तेव्हा त्याला बोलावले जाईल. त्याला मधल्या लीगमधून घरी पाठवण्यात आले. मात्र, त्या हंगामात आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. यानंतर हर्षलने व्हिटोरीला एक मॅचही खेळू देण्याची विनंती केली होती.
हर्षलने या मुलाखतीत सांगितले की, 'लहानपणापासून मी माझ्या वडिलांना आठवड्याचे सातही दिवस काम करताना पाहिले आहे. हिवाळा असो की उन्हाळा, पावसाळा कुठलाही ऋतूमध्ये ते काम करत असायचे. माझे आईवडील 2008 मध्ये अमेरिकेला गेले. तेव्हा मी १७ वर्षांचा होतो आणि ते आर्थिक मंदीचे वर्ष होते. त्यावेळी भारतातील लोक ज्यांचे शिक्षण फारसे चांगले नव्हते आणि ज्यांना तेथील भाषा येत नव्हती. तिथे जाऊन वर्षानुवर्षे मजुरीचे करावे लागत असायचे. आता अमेरिकेत आल्यानंतर काम करणं आवश्यक होतं,
जीवन जगण्यासाठी काम करणे गरजेचे होते. कारण कुटुंबाची जबाबदारी त्याला घ्यावी लागत होती. म्हणून त्याने न्यू जर्सीमध्ये एका पाकिस्तानी माणसाच्या मालकीच्या परफ्यूमच्या दुकानात काम करणे सुरू केले. इंग्रजी येत नव्हते. कारण सगळा अभ्यास गुजराती माध्यमात झाला होता. ज्या भागात हे दुकान होते. तेथे लॅटिन आणि आफ्रिकन अमेरिकन लोक राहत होते. त्याची इंग्रजी भाषा इतर अमेरिकन लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पण नंतर तो हळूहळू त्या मोडकी इंग्रजी भाषा शिकला. तेथील कामाचा अनुभव हा त्याचं जीवन बदलून टाकणारा होता.
हर्षलचे काका-काकूही तेथे नोकरी करत असायचे. ते जेव्हा कामावर जात तेव्हा हर्षला त्याच्या दुकानावर सोडून देत असतं. सकाळी सात वाजता तो तेथे कामाच्या ठिकाणी पोहचत असायचा, तर दुकान 9 वाजता सुरू होत असायचे. त्यामुळे तो तेथील जवळील एलिझाबेथ स्टेशनवर जाऊन बसत असायचा. दुकानात काम करुन तो रात्री आठ वाजता घरी येत असायचा. एका दिवसासाठी त्याला 35 डॉलर पगार मिळत असायचा.
काही दिवसानंतर हर्षलने परत क्रिकेट खेळण्याचं आणि त्यात करिअर करण्याचं ठरवलं. तेव्हा आई-वडिलांना त्याला तंबी दिली होती की, आमचं नाक नको कापू, म्हणजेच काय करतोय तर कर पण यशस्वी हो. क्रिकेटसाठी तो परत भारतात परतला. रोज सकाळी तो सात वाजता मोटेरा स्टेडियमवर सराव करण्यासाठी जात असायचा. तेव्हा त्याच्याकडे सॅण्डविच खायला साधे 15 रुपयेही नसायचे. वडिलांनी त्याला पैशांची बचत करण्याचं शिकवलं आहे. आता त्याला लिलावतून मिळालेलं 10 कोटी रुपये हे एफडी करण्यास सांगितलं आहेत आणि ते केले सुद्धा.