IPL 2022: लाईव्ह मॅचमध्ये चहल आणि अंपायरमध्ये वाद; कर्णधार सॅमसननेही घेतली उडी 

IPL 2022
Updated Apr 11, 2022 | 16:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuzvendra Chahal Viral Video | राजस्थान रॉयल्सच्या संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने रविवारी लखनऊ सुपरजायंट्स विरूध्दच्या सामन्यात ४ बळी घेऊन निर्णायक भूमिका पार पाडली. परंतु सामन्यादरम्यान एक क्षण असा देखील आला जेव्हा युझवेंद्र चहल मैदानावरील अंपायरशी वाद घालताना दिसला.

IPL 2022 Yuzvendra Chahal and umpire dispute in a live match
लाईव्ह मॅचमध्ये चहल आणि अंपायरमध्ये वाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लखनऊ सुपरजायंट्सविरूध्दच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शानदार विजय मिळवला.
  • युझवेंद्र चहलचा अंपायरशी वाद घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • कर्णधार संजू सॅमसनने केला हस्तक्षेप.

Yuzvendra Chahal Viral Video | मुंबई : राजस्थान रॉयल्सच्या (RR) संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) रविवारी लखनऊ सुपरजायंट्स विरूध्दच्या सामन्यात ४ बळी घेऊन निर्णायक भूमिका पार पाडली. परंतु सामन्यादरम्यान एक क्षण असा देखील आला जेव्हा युझवेंद्र चहल मैदानावरील अंपायरशी वाद घालताना दिसला. युझवेंद्र चहल आणि अंपायर यांच्यामध्ये वाद सुरू असताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने हस्तक्षेप केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (IPL 2022 Yuzvendra Chahal and umpire dispute in a live match). 

अधिक वाचा : Jharkhand Ropeway Mishap : हवेत लटकला 48 जणांचा जीव

लाईव्ह सामन्यात चहलचा अंपायर सोबत वाद

दरम्यान, लखनऊ सुपरजायंट्सच्या फलंदाजीदरम्यान युझवेंद्र चहल १८ वे षटक टाकत होता. १८ व्या षटकात लखनऊ सुपरजायंट्सचा फलंदाज दुष्मंता चमीराला फसवताना युझवेंद्र चहलचा पाचवा चेंडू विकेटकिपरच्या हातात गेला. त्यानंतर अंपायरने हा वाईड चेंडू असल्याचे घोषित केले. अंपायरचा हा निर्णय पाहून चहल चांगलाच भडकला आणि अंपायरशी वाद घालू लागला. तेवढ्यात संघाचा कर्णधार संजू सॅमसनने देखील या वादात उडी घेतली. 

अधिक वाचा : स्टेट बॅंकेच्या एटीएएममधून ओटीपी-आधारित पैसे कसे काढाल...

संजू सॅमसन हस्तक्षेप करताना दिसला

युझवेंद्र चहलच्या हावभावावरून स्पष्ट होते की तो अंपायरच्या निर्णयावर अजिबात संतुष्ट नव्हता, त्यामुळे तो थेट सामन्यात पंचांशी वाद घालताना दिसला. सामना पाहणाऱ्या समालोचकांनीही युझवेंद्र चहलचा चेंडू वाईड नसल्याचे मान्य केले. चहल जेव्हा अंपायरशी वाद घालतो तेव्हा राजस्थानच्या संघाचा कर्णधार संजू सॅमसनही हस्तक्षेप करताना दिसतो. राजस्थानच्या संघाचा कर्णधार संजू सॅमसनला देखील असे वाटत होते की, चेंडू वाईड नाही, पण त्याने अखेर पंचानी दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आणि खेळ चालू ठेवला. 

चहलचा राग फलंदाजावर निघाला 

मात्र, त्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर युझवेंद्र चहलने फलंदाजावरच राग काढला आणि त्याला एलबीडब्ल्यू बाद करून बाहेरचा रस्ता दाखवला. युझवेंद्र चहलने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध ४ बळी पटकावले, त्यानंतर चहलला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कारही देण्यात आला. युझवेंद्र चहलने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ११ बळी पटकावले आहेत. युझवेंद्र चहलने उमेश यादवला मागे टाकत पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी