Virat Kohli Bhojpuri Viral Video: IPL 2023 मध्ये विविध भाषांमधील काँमेंट्रीने एक वेगळं वातावरण तयार केलं आहे. मात्र यातील भोजपुरी भाषेतील काँमेंट्रीने केवळ क्रिकेट फॅन्सच नाही तर क्रिकेटर्सचही लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतचं आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ही भोजपुरी भाषेतील कॉमेंट्री ऐकली. ही मजेशीर भोजपुरी काँमेंट्री ऐकताना विराट कोहलीला हसू आवरलं नाही. भोजपुरीतील एक-एक ठेवणीतील शब्द त्याला ऐकायला मिळाले. (IPL 2023 Bhojpuri Commentary Virat Kohli Video Viral)
त्याच झालं असं की, शनिवारी विराट कोहली एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओ क्लिपमध्ये तो आयपीएलची भोजपुरी आणि पंजाबी भाषेतील कॉमेंट्री ऐकताना दिसत होता. तो बॅटिंग करत असताना, होत असलेली भोजपुरी भाषेतील कॉमेंट्री बघून तो पोट धरुन हसताना दिसला. "लपेट लिहीस", "धमाका हुई गवा" आणि "मुह फोडबा का" या शब्दांनी तो फक्त खळखळून हसलाच नाही तर हे शब्द त्याने स्वतःही म्हणण्याचा प्रयत्न केला.
अधिक वाचा: MI v KKR : मुंबईसाठी अर्जुन ठरला लकी; जिगरबाज केकेआरवर दणदणीत विजय
विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला की, "मला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. तुम्हाला ही भाषा थोडी जरी समजली तरी तुमच्यासाठी हे खूप मोठं एंटरटेन्मेंट ठरेलं.
अधिक वाचा: पहिल्या नजरेत रिंकू मनात भरला; जाणून घ्या काय आहे Porn star च्या प्रेमाची इनसाईट स्टोरी
"मुह फोडबा का" ही ओळ ऐकल्यावर तर विराटची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. हा शब्द ऐकताच तो मोठ्याने हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतो. दरम्यान, ट्विटरवर युजर्सनी व्हिडिओवर मोठ्या संख्येने कमेंट्स केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये भोजपुरी कॉमेंट्री ऐकायला मिळणे ही चांगली गोष्ट आहे, हे खूपच एंटरटेनिंग आहे, असं युजर्सनी म्हटलं आहे.