Ajinkya Rahane IPL 2023: कसोटी फलंदाज म्हणणाऱ्या टीकाकारांना अजिंक्य रहाणेने दिले चोख प्रत्युत्तर, ठोकले जलद अर्धशतक 

IPL 2023
Updated Apr 10, 2023 | 18:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ajinkya Rahane : आयपीएल 2023 च्या या हंगामात सर्वात जलद अर्धशतक ठोकवणारा फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणे ने ला बहुमान मिळाला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर त्याने ही कमाल खेळी खेळली.

अर्शदच्या एका षटकामध्ये रहाणे ने लगावल्या २३ धावा
अजिंक्य रहाणे 19 चेंडूत पन्नास  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • IPL 2023 चे सर्वात वादळी अर्धशतक
  • मुंबई इंडियन्सविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले
  • चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये पटकावले दुसरे वेगवान अर्धशतक

MI vs CSK : मुंबई : आयपीएल 2023 मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून अशा एका क्रिकेटपट्टूची वर्णी लागली आहे, की ज्याला टिकाकारांकडून नेहमी कसोटी फलंदाज असे ट्रॉल केले जात होते. पण, त्या खेळाडूने करून दाखवले आणि सर्व टिकाकारांचे तोंड बंद झाले. आयपीएल 2023 च्या या हंगामात सर्वात जलद अर्धशतक ठोकवणारा फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणेने बहुमान पटकावला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर त्याने ही कमाल खेळी खेळली. (ipl csk batsman ajinkya rahane scored fastest half century of ipl 2023 against mumbai indians at wankhede)

अधिक वाचा : कांदा अनुदान पात्रतेसाठी ई-पीक पेरा नोंदीची अट शिथिल करा

IPL 2023 चे सर्वात वादळी अर्धशतक

रहाणेने आपल्या घरच्या मैदानावर धडाकेबाज फलंदाजी करताना अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या तुलनेमध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला आहे. अजिंक्य रहाणेने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळी करत मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.

अर्शदच्या एका षटकामध्ये रहाणे ने लगावल्या २३ धावा 

अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाज अर्शद खानविरुद्ध वादळी फलंदाजी केली. अर्शदच्या एका षटकामध्ये त्याने चार चौकार आणि एका षटकारासह एकूण २३ धावा केल्या. हा उजव्या हाताचा फलंदाज इथेच थांबला नाही तर त्याने आपला हा फॉर्म कायम रखत या आयपीएलच्या या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. रहाणेने अवघ्या 19 चेंडूंमध्ये लगावलेले अर्धशतक आयपीएलच्या इतिहासातील तिसरे जलद अर्धशतक आहे.

अधिक वाचा : ​Kiren Rijiju : केंद्रीयमंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात

चेन्नईसाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या फलंदाजांमधील हे दुसरे वेगवान अर्धशतक आहे, मुंबई विरुद्ध सामन्यामध्ये रहाणेने 225 च्या स्ट्राईक रेटने 27 चेंडू खेळले आणि बाद होण्यापूर्वी 61 धावा ठोकल्या. यापूर्वी, सीएसकेसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे, ज्याने 2014 मध्ये केवळ 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी