मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15व्या सीझनमध्ये यंदा 10 संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटच्या मैदानाला यातून आगळीच शोभा आली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामात उतरलेल्या एकाहून एक सरस खेळाडूंमध्ये एक गोलंदाज असाही दिसतोय, ज्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. यानं आपली शेवटची आयपीएल मॅच आजपासून 5 वर्षांपूर्वी खेळली होती, मात्र त्याचं रेकॉर्ड आजही कायम आहे. (IPL 2022: The bowler's charisma is at its peak, batsmen literally have to struggle for runs)
अधिक वाचा : Michael Vaughan: मायकेल वॉनची मोठी भविष्यवाणी, हा संघ जिंकणार आयपीएल २०२२चा खिताब
हा गोलंदाज कुणी दुसरा नाही, तर प्रवीण कुमार आहे. आईपीएलच्या 5 संघांचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज प्रवीण कुमारने आपला शेवटचा आईपीएल सामना गुजरात लॉयन्सच्या संघाकडून खेळली होती. त्याच्या गोलंदाजीची जादू काही अशी आहे, की आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वाधिक मेडन ओव्हर टाकलेत. खास गोष्ट ही, की प्रवीण कुमारच्या या रिकॉर्डला आजवर कुठलाच गोलंदाज तोडू शकलेला नाही. प्रवीण कुमार गेली 5 वर्ष आयपीएलपासून दूर आहे, हे विशेष.
अधिक वाचा : विराट आता बास झालं, ब्रेक घे नाही तर.... शास्त्रीबुवांचा सल्ला
आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला. यादरम्यान त्याने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध हॅटट्रिक देखील केली होती. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील सातवा गोलंदाज ठरला. 2011 ते 2013 दरम्यान तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडूनही खेळला होता. अशाप्रकारे, प्रवीणने 2008 ते 2017 या कालावधीत किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि आरसीबी या चार संघांकडून खेळताना आयपीएलमध्ये 14 षटके मेडन खेळली आहेत.
अधिक वाचा : RCB vs LSG: लोकेश राहुलला सामना हरल्यानंतर बसला आणखी एक झटका, लाखोंचा फटका
या यादीत त्याच्यानंतर इरफान पठाणचे नाव आहे, ज्याने 9 षटके टाकली आहेत आणि तो देखील बर्याच काळापासून आयपीएल खेळत नाही. अशाप्रकारे प्रवीण कुमारचा हा विक्रम आजतागायत मोडता आलेला नाही. दुसरीकडे, जर आपण त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर प्रवीण कुमारने 119 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत.