विचित्र योगायोग : तीच तारीख, तोच निकाल, हा आकडा पाहून दिल्लीचा संघही बुचकळ्यात पडली असेल 

IPL 2021
प्रशांत जाधव
Updated Apr 28, 2021 | 13:01 IST

IPL Throwback, Delhi Capitals again lose by One run: दिल्ली कॅपिटल्स संघाचा पुन्हा एकदा 1 धावांनी पराभव झाला आहे.  विशेष म्हणजे ५ वर्षांपूर्वीही असेच काहीसे घडले आणि तारीखही तीच होती.

ipl throwback delhi capitals lose for the second time by one run on same date in Ipl history
विचित्र योगायोग : तीच तारीख, तोच निकाल, संघ वेगळा (सौजन्य : IPL) 

थोडं पण कामाचं

  • बंगळुरूने दिल्लीला 1 धावांनी पराभूत केले, समोर आली जुनी आकडेवारी 
  • 5 वर्षांपूर्वी, हीच तारीख, हाच निकाल 
  • यावेळी बंगळुरू, त्यावेळी गुजरात लायन्सचा संघ समोर होता

अहमदाबाद :  दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने 48 चेंडूत नाबाद 58 धावा फटकावल्या. शिमरोन हिटमायरने 25 चेंडूत नाबाद 53 धावा फटकावल्या. असे असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या चेंडूवर 1 रनने सामना गमावला. दिल्ली कॅपिटल्सचे चाहते आणि खेळाडू खूप दुःखी होतील पण त्यांच्यासोबत असे प्रथमच घडले नाही. हे यापूर्वीही घडले आहे आणि तारीखही हीच होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी 27 एप्रिल 2021 रोजी दिल्लीच्या दिल्ली कॅपिटल्सचा 1 रन्सनी पराभूत केले. पण हे प्रथमच घडले नाही. शेवटच्या वेळी जेव्हा घडले, तेव्हा तारीख आणि स्कोअर देखील समान होते, फक्त विरोधी संघ आणि वर्ष वेगळे होते. आम्ही आयपीएल 2016 बद्दल बोलत आहोत. पाच वर्षांपूर्वी त्या स्पर्धेत 27 एप्रिल रोजी दिल्लीचा 1 धावांनी पराभव झाला होता.

27 एप्रिल 2016 रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाचा गुजरात लायन्सविरूद्ध 1 रनने पराभव झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यावेळी 171 धावा केल्या, तर पाच वर्षांपूर्वी गुजरात लायन्सने 172 धावा केल्या. मंगळवारी दिल्लीच्या संघाने 4 विकेट गमावल्यानंतर केवळ  170 धावा करता आल्या तर शेवटच्या वेळी त्यांना 5 विकेट गमावून 171धावा करता आल्या. दोन्ही वेळी दिल्लीने केवळ एक रन्सने सामना गमावला. 

त्या सामन्यात रिषभ पंतसुद्धा दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग होता पण दिल्लीच्या गुजरात लायन्स विरूद्ध खेळलेल्या या सामन्यात पंतने 17 चेंडूत 20 धावा केल्या होत्या, यावेळी त्याने अर्धशतक ठोकले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी