Who is Ayush Badoni, LSG vs DC: जर सध्याच्या काळात असा कोणता मंच आहे जो कमी वेळात सामान्य क्रिकेटरपासून(cricketer) एखाद्याला स्टार क्रिकेटर बनवतो तर ही स्पर्धा आहे आयपीएल. दर आयपीएल(ipl) हंगामात चाहते तसेच दिग्गजांच्या नजरा एका गोष्टीवर टिकून असतात त्या म्हणजे यावेळेस आयपीएलचा तारा कोण आहे. म्हणजे कोणता खेळाडू या हंगामात धमाल करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे(international cricketer) दरवाजे ठोठावू शकतो. यंदाच्या आयपीएल २०२२च्या हंगामातील १५ सामने झाले आहेत. मात्र एक खेळाडू असा आहे ज्याच्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू म्हणजे आयुष बदोनी(ayush badoni). Is this cricketer find of ipl 2022?
अधिक वाचा - IPL 2022: बेसबॉलसारखा हेल्मेट घालून का मैदानात उतरतो कार्तिक
कालच्या रात्री नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये जेव्हा लखनऊ सुपरजायंट्सचा संघ मैदानावर उतरला आणि दिल्लीसारख्या तगड्या संघाला मात दिली. त्यांच्यासमोर १५० धावांचे लक्ष्य होते मात्र दवामुळे येथे खेळणे काही सोपे नव्हते. जेव्हा लखनऊचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा क्विंटन डी कॉकने ८० धावा करत लखनऊच्या विजयासाठीचा पाया रचला. मात्र दिल्लीच्या संघाने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्यांनी सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला.
Young Badoni finishes things off in style.@LucknowIPL win by 6 wickets and register their third win on the trot in #TATAIPL. — IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
Scorecard - https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/ZzgYMSxlsw
शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी स्टार शार्दूल ठाकूरच्या हाती बॉल होता. लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या. शार्दूलने पहिल्या बॉलवर दीपक हुड्डाला बाद केले. त्यानंतर सामना रोमहर्षक झाला. पिचवर २२ वर्षांचा आयुष बदोनी आला त्याच्यावर विजयाची मोठी जबाबदारी होती. पाच बॉलमध्ये ५ धावा हव्या होत्या. दुसऱ्या बॉलवर एकही धाव झाली नाही. मात्र असे असतानाही बदोनीच्या चेहऱ्यावर ना दबाव दिसत होता ना भीती. तसेच आपल्या एका चुकीने आपण सामन्यातील व्हिलन ठरू शकतो अशी भीतीही नव्हती. चौथ्या बॉलवर शानदार गॅप काढत त्याने चौकार ठोकला आणि पाचव्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरवर जबरदस्त सिक्स ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू हे पाहत राहिले.
अधिक वाचा - राऊत शिवसेनेसोबत नाहीत; भाजपची टोमणा
विशेष म्हणजे या वर्षी टी-२० वर्ल्डकप होत आहे आणि भारतीय टी-२० निवडीमध्ये आयपीएलचे नेहमीच योगदान राहिले आहे. निवडसमितीच्या नजराही आयपीएलच्या या हंगामावर टिकून असतील कारण आयुष बदानी असो वा मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शाहबाज अहमद. अनेक युवा खेळाडू दररोज समोर येत असतात.