मुंबई: मुंबई इंडियंस (Mumbai Indians) ने बुधवारी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना १२ धावांनी गमावला. या पराभवासह मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल २०२२मध्ये पराभवाचा पंच मारला. पंजाब किंग्सविरुद्ध(Punjab Kings)विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या या पराभवासाठी काही प्रमाणात सूसूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला जबाबदार ठरवले जात आहे. Is this mistake of suryakumar yadav for mumbai indians defeat?
अधिक वाचा - Taxi प्रवास महागणार, प्रत्येक ट्रिपच्या भाड्यात 12-15% वाढ
खरंतर, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीदरम्यान सूर्यकुमार यादवच्या खराब रनकॉलमुळे मोक्याच्या क्षणी मुंबई इंडियन्सचे दोन फलंदाज रनआऊटचे शिकार ठरले. रनआऊट होणाऱ्या फलंदाजांमध्ये तिलक वर्मा आणि किरेन पोलार्डच्या नावाचा समावेश होतो. तिलक वर्मा १३व्या ओव्हरमध्ये १३१ धावसंख्येवर सूर्यकुमार यादवच्या खराब रनकॉलमुळे रनआऊट झाला.
सूर्यकुमार यादव शॉट खेळल्यानंतर धाव काढण्याऐवजी बॉलकडेच पाहत राहिला आणि दुसरीकडे तिलक वर्मा क्रीझपेक्षा खूप पुढे आला होता. या दरम्यान पंजाब किंग्सने ही संधी गमावली नाही आणि कर्णधार मयांक अग्रवालने तिलक वर्माला रनआऊट केले. तिलक वर्माने ३६ धावा केल्या होत्या. यानंतर १७व्या ओव्हरमध्ये किरेन पोलार्डही सूर्यकुमासोबत धावा घेण्याच्या चुकीदरम्यान रनआऊटचा शिकार ठरला.
अधिक वाचा - पराभवानंतर रोहित शर्माला लाखो रूपयांचा फटका
किरेन पोलार्ड १० धावा करून बाद झाला होता. तिलक वर्मा आणि किरेन पोलार्ड यांच्या रनआऊटने पूर्ण खेळच बदलला. यानंतर स्वत: सूर्यकुमार यादव ४३ धावा करून बाद झाला आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग पाचव्या पराभवास सामोरे जावे लागले.
बुधवारी पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी रोहित र्मावर २४ लाख रूपयांचा दंड ठोठावला. तर, मुंबई इंडियन्सच्या बाकी खेळाडूंवर ६ लाख अथवा २५ टक्के मॅच ज्यापैकी कमी असेल तितका दंड ठोठावला जाईल. मुंबई इंडियन्सा संघ आणि त्याचा कर्णधार रोहित शर्मावर या आयपीएलच्या हंगामात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार आहे.