Ishan Kishan Net Worth | मुंबई : 'छोटा पॅकेट बडा धमाका' म्हणून सर्वत्र प्रसिध्द असलेला खेळाडू म्हणजे ईशान किशन. किशन सध्या देशातील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर अखेर त्याला मागील वर्षी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तेव्हापासून तो भारतीय संघासाठी हिरो बनत चालला आहे. (Ishan Kishan IPL Ishan Kishan owns so much wealth).
अधिक वाचा : महाराष्ट्रात काॅंग्रेसचे २५ आमदार बंडखोरीच्या तयारीत
नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात ईशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या युवा खेळाडूच्या एकूण मालमत्तेबद्दल भाष्य करायचे झाले तर तो सध्या सुमारे ४५ कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. ईशानच्या कमाईचा आणि एकूण संपत्तीचा मुख्य स्त्रोत क्रिकेटमधून आला आहे. याशिवाय त्यांची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. किशन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रिकेट सामने आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून दरवर्षी खूप कमाई करतो. याशिवाय तो अनेक ब्रँड्सचे देखील खूम कमाई करतो ज्यातून तो खूप मोठी रक्कम मिळते.
अधिक वाचा : ...म्हणून गुढीपाडवा साजरा करतात
ईशान किशनचा जन्म पाटना, बिहार येथे झाला होता. त्याच्या वडीलांचे नाव प्रणव कुमार पांडे आहे ते पेशाने बिल्डर आहेत. क्रिकेटमध्ये करिअर बनवण्यासाठी त्याचा भाऊ राज किशनने त्याला साथ दिल्याचे सांगितले जाते. बिहार क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यातील नोंदणीच्या समस्येमुळे, ईशानने वरिष्ठ खेळाडू आणि मित्राच्या सल्ल्यानुसार शेजारच्या झारखंड राज्यातून खेळण्यास सुरुवात केली होती.
ईशान किशनने आत्तापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९.३३ च्या सरासरीने आणि १०७.३२ च्या स्ट्राइक रेटने ८८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय त्याने १० टी-२० सामन्यांमध्ये ३२.११ च्या सरासरीने आणि १२१.४३ च्या स्ट्राइक रेटने २८९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.