MS Dhoni ला पर्याय म्हणून 'हा' खेळाडू: एमएसके प्रसाद

IPL 2020
Updated Nov 15, 2020 | 12:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितेचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, एमएस धोनीचा पर्याय म्हणून मुंबई इंडियन्सचा ईशान किशन सज्ज आहे.

Ishan Kishan is an alternative to MS Dhoni
MS Dhoni ला पर्याय म्हणून 'हा' खेळाडू,  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • एमएस धोनीचा पर्याय म्हणून मुंबई इंडियन्सचा ईशान किशन सज्ज आहे
  • आयपीएल २०२० मध्ये ईशान किशनने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. 
  • आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितेचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, एमएस धोनीचा पर्याय म्हणून मुंबई इंडियन्सचा ईशान किशन सज्ज आहे. आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सच्या यशामागे अनकॅप्ड फलंदाज ईशान किशनचा मोठा हात आहे. आयपीएल २०२० मध्ये ईशान किशनने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. 

यूएईमध्ये संपन्न झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने भारतीय संघात प्रवेश मिळण्यासाठी आपली दावेदारी सिद्ध केली. सूर्यकुमार यादवविषयी बरीच चर्चा होत असताना भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांचे मत आहे की किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज आहे. 

ईशान किशन मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले की, किशन वन डे आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज आहे. जुलै २०१९ नंतर भारतीय संघ नियमित विकेटकीपर फलंदाजाचा शोध घेत आहे. एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि आता भारतीय संघ धोनीला पर्याय शोधत आहे. केएल राहुल सध्या विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळत आहे आणि संजू सॅमसन बॅकअप म्हणून उपलब्ध आहे. 

प्रसाद म्हणाले, 'या पॉकेट डायनामाइटला ऍक्शनमध्ये पाहून छान वाटले. नंबर ४ आणि नंतर ओपनिंग या दोनही ठिकाणावर ईशानने आपली क्षमता दाखवली. संघाच्या गरजेनुसार त्याच्या खेळाच्या गतीतील बदलामुळे त्याने टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दावा सादर केला आहे. ईशान किशन एकदिवसीय आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळू शकतो.

प्रसाद पुढे म्हणाले, “जर त्याने चांगली विकेटकीपिंग केली आणि चांगली फलंदाजी केली तर तो संघासाठी बोनस ठरू शकतो." २०१८ मध्ये ईशान किशन मुंबई इंडियन्समध्ये ६.२ कोटी रुपयांमध्ये सामील झाला. डाव्या हाताच्या फलंदाजाने आयपीएल २०२० मध्ये १४५.७६ च्या स्ट्राईक रेटने ५१६ धावा केल्या. त्याने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून  हंगाम सुरू केला आणि त्यानंतर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला फलंदाजी केली. हंगामात मुंबई इंडियन्सच्या यशामध्ये किशनने आपल्या खेळातील सातत्य कायम राखले आणि महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी