मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२२(indian premier league 2022)मधील काही सामने पार पडलेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा(royal challengers bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिस(faf du plesis) सध्या ८८ धावांसह ऑरेंज कॅप घालून विराजमान आहे. तर मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन(ishan kishan) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत ८० धावांपेक्षा अधिक धावांची खेळी केली मात्र तरीही दोघे आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ishan kishan is in race of orange cap in ipl 2022
अधिक वाचा - तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल
तर ऑरेंज कॅपच्या दावेदारीमध्ये तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. डू प्लेसिस, इशान आणि धोनी शिवाय आतापर्यंत एकालाही ५० धावा ठोकता आलेल्या नाहीत. एक नजर टाकूया टॉप १० फलंदाजांवर...
फाफ डू प्लेसिस - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - सामने २ - ९३ धावा
इशान किशन - मुंबई इंडियन्स - सामना १ - ८१ धावा
एडन मार्करम - सनरायजर्स हैदराबाद - सामना १ - ५७ धावा
संजू सॅमसन - राजस्थान रॉयल्स - सामना १ - ५५ धावा
दीपक हुड्डा- लखनऊ सुपर जायंट्स - सामना १ - ५५ धावा
टॉप १० बॅटर्समध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवनसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. स्पर्धेत जसजसे सामने होत जातील तशी ऑरेंज कॅप जिंकण्याची ही स्पर्धा अधिक रोमहर्षक होईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या डोक्यावर ऑरेंज कॅप होती. तर फाफ डू प्लेसिस दुसऱ्या स्थानावर होता.
अधिक वाचा - आरोपपत्र सादर करायला 60 दिवसांचा अवधी
आरसीबीने आयपीएल मेगा लिलावात ७ कोटी रूपये खर्च करून फाफ डू प्लेसिसचा संघात समावेश केला. भारतीय संघाचा कर्णधार असताना कामाचा ताण कमी करण्यासाठी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे कोहलीनंतर आरसीबीच्या संघाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत आरसीबीच्या फ्रँचायझीने डू प्लेसिसकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे.