Mumbai Indians: रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वात मुंबई इंडियन्सची(mumbai indians) परिस्थिती सध्या खराब आहे. १५व्या हंगामात मुंबईने आधीच तब्बल ८ सामने गमावले आहे. मात्र आता टीमचे कोच महेला जयवर्धनेने संकेत दिलेत की ते आपल्या प्लेईंग ११मध्ये(playing 11) काही मोठे बदल करू शकतात. ishan kishan may be dropped from Mumbai indians team
अधिक वाचा - मूळव्याधाने वैतागला आहात का? 5 जबरदस्त टिप्स, व्हा तंदुरुस्त
मुंबई इंडियन्सचे कोच महेला जयवर्धनेने आपल्या फलंदाजांच्या सततच्या अपयशामुळे त्यांच्या क्रमात बदल करण्याचे संकेत दिलेत. त्यांन सलामीवीर इशान किशनच्या खराब फॉर्मबाबतही चिंता व्यक्त केली. पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकणारा मुंबई संघ सध्या खराब फॉर्मातून जात आहेय रविवारी त्यांना लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभवास सामोरे जावे लागले त्यांचा हा सलग ८वा पराभव होता.
जयवर्धनेने सामन्यानंतर जेव्हा फलंदाजी क्रमामध्ये संभाव्य बदलांबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला, चांगला प्रश्न आहे. मला याची समीक्षा करावी लागेल आणि कोणतीही रणनीती तयार करण्याआधी इतर कोचसोबत बोलावे लागेल. फलंदाजी आमच्यासाठी चिंतेची बाब आहे विशेषतरून चांगल्या विकेटवरही आम्ही चांगली फलंदाजी केलेली नाही. टीममध्ये अनुभवी फलंदाज आहेत ज्यांना परिस्थितीचा अंदाज आणि त्यांनी याआधीही चांगली कामगिरी केलेली आहे. आम्हाला आता पुढे जावे लागेल आणि जर आम्हाला बदल करण्याची गरज पडली तर आम्ही तसे करू.
आम्ही आतापर्यंत काही बदल केले मात्र जास्त बदल केलेले नाहीत. आम्हाला फलंदाजीत सातत्य बनवायचे होते. निश्चितपणे काही गोष्टी चिंतेच्या आहेत कारण आम्ही आधी फलंदाजी केली अथवा लक्ष्याचा पाठलाग केला तरी आमच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.
अधिक वाचा - दुधी भोपळा आहे मोठा गुणकारी...पाहा 5 जबरदस्त फायदे
जयवर्धने इशान किशनसोबत बोलणार आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतक ठोकली होती मात्र त्यानंतर सातत्याने तो धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. तो संघर्ष करत आहे. आम्ही त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करण्याची सूट दिली होती. मी आतापर्यंत त्याच्याशी बोललो नव्हतो मात्र आता लवकरच त्याच्याशी बोलावे लागेल. मुंबईने या वर्षाच्या सुरूवातीस आयपीएल लिलावात किशनला १५.२५ कोटी रूपयांना खरेदी केले होते.