IPL 2022: रोहित शर्मा खेळाडूंना देतो शिव्या; ज्युनिअर खेळाडूच्या आरोपाने खळबळ 

IPL 2022
Updated Apr 06, 2022 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma IPL | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे, मात्र आयपीएलचे सर्वाधिक किताब पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरूवात नेहमी प्रमाणेच यंदाच्या हंगामात देखील निराशाजनक झाली आहे. अशातच आता संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे समजते आहे. कारण भारतीय संघातील खेळाडूंचे जसे मैदानाबाहेर किस्से घडतात तसेच किस्से सरावादरम्यान देखील घडत असतात.

Ishan Kishan said that Rohit Sharma was abusing the ground
रोहित शर्मा खेळाडूंना शिव्या देतो, ज्युनिअर खेळाडूचा आरोप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली आहे.
  • रोहित शर्मा खेळाडूंना शिवीगाळ करतो असे ईशान किशनने म्हटले.

Rohit Sharma IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे, मात्र आयपीएलचे सर्वाधिक किताब पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरूवात नेहमी प्रमाणेच यंदाच्या हंगामात देखील निराशाजनक झाली आहे. अशातच आता संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे समजते आहे. कारण भारतीय संघातील खेळाडूंचे जसे मैदानाबाहेर किस्से घडतात तसेच किस्से सरावादरम्यान देखील घडत असतात. भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मावर देखील एका ज्युनिअर खेळाडूने गंभीर आरोप केला आहे. त्याच्या वक्तव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. (Ishan Kishan said that Rohit Sharma was abusing the ground). 

अधिक वाचा : एसटी कामगारांना 15 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम

आयपीएलच्या मेगा लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशन आहे. त्याने यंदाच्या हंगामात दोन सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्याने त्याबाबतचे काही किस्से देखील शेअर केले. 

त्याने म्हटले की, "रोहित मैदानात नेहमी शांत डोक्याने खेळत असतो. अनेकदा तो जे बोलतो तेच घडत असते. एकदा मला वाटले की रोहितने अशी का फिल्डिंग लावली असावी? मात्र त्याच उत्तर मला फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर समजले. रोहितने जे केले त्यामुळे मला चांगलाच फायदा झाला." 

अधिक वाचा : NEET परीक्षेची मोठी अपडेट... सुरु होऊ शकते रजिस्‍ट्रेशन

राहुल चाहरने देखील चांगली कामगिरी केली याचे श्रेय रोहितचे आहे. त्याचा खेळाडूंवर असलेला विश्वास आमचा आत्मविश्वास वाढवतो. तसेच रोहित शर्मा सामन्यात शिवीगाळ देखील करतो. मात्र त्यानंतर याला गंभीर घेऊ नका असे देखील तो सामना झाल्यानंतर सांगतो. असे काही किस्से ईशानने रोहित बाबतचे सांगितले. 

लक्षणीय बाब म्हणजे ईशानने म्हटले की, "मलाही एकदा रोहितने शिवीगाळ केली होती, मात्र त्यावेळी माझी चूक होती. मैदानात मी झेल न घेता चेंडू खाली पडून दिला. जमिनीवर दवबिंदू होते त्यामुळे चेंडू खराब झाला. त्यामुळे रोहितने मला शिवीगाळ केल्याचे ईशानने म्हटले. 

२३ वर्षीय ईशान किशनला मुंबईच्या संघाने १५.२५ कोटी रूपयांना खरेदी केले आणि आपल्या संघात कायम ठेवले. यंदाच्या हंगामातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबईच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली असली तरी किशनने त्याच्या परीने चांगली कामगिरी केली आहे. तसेच आगामी कोलकाता विरूध्दच्या सामन्यात सर्व चाहत्यांचे लक्ष किशनच्या खेळीकडे असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी