IPL 2022 Final । मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा अंतिम सामना (Final Match) २९ मे रोजी म्हणजेच रविवारी गुजरात टायटन्स (GT) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये होणार आहे. गुजरात टायटन्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला चितपट करून फायनलमध्ये प्रवेश केला होता, आता त्याच संघासोबत गुजरातचा संघ किताबासाठी मैदानात उतरेल. गुजरातने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले होते, त्यामुळे त्यांना अंतिम फेरी जिंकण्यासाठी आयपीएलचा इतिहास बदलावा लागेल. (It is difficult for Gujarat Titans to become champions, History will have to change to win the cup).
अधिक वाचा : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख केईएममध्ये दाखल
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील हा १५ वा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याचा संघ गुजरात टायटन्सने साखळी सामन्यातील १४ पैकी १० सामने जिंकले आणि २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १४ फायनल सामन्यांमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाने आतापर्यंत केवळ पाच वेळाच आयपीएलचा किताब पटकावला आहे. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवायचे असेल तर हा विक्रम बदलणे गरजेचे आहे.
साखळी सामन्यांमध्ये टॉपवर | विजेता | वर्ष |
राजस्थान रॉयल्स | राजस्थान | २००८ |
चेन्नई सुपर किंग्स | चेन्नई | २०११ |
मुंबई इंडियन्स | मुंबई | २०१७ |
मुंबई इंडियन्स | मुंबई | २०१९ |
मुंबई इंडियन्स | मुंबई | २०२० |
गुजरात टायटन्समध्ये टॉपवर असण्याचा इतिहास भलेही संघाच्या विरोधात असला तरी एक इतिहास गुजरातच्या बाजूने आहे. कारण २०११ पासून आयपीएलमध्ये प्लेऑफ फोर्मेटची सुरुवात झाली. प्लेऑफ फॉर्मेट सुरू झाल्यापासून क्वालिफायर-१ जिंकणारा संघ अंतिम सामना फक्त ३ वेळा हरला आहे. २०११ पासून आतापर्यंत या ११ हंगामात पहिला क्वालिफायर सामना जिंकणाऱ्या संघाने ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०१३ मध्ये चेन्नई (CSK), २०१६ मध्ये आरसीबी (RCB) आणि २०१७ मध्ये पुणे या संघाना आतापर्यंत पराभवाचा सामना करावा लागला आहे.