IPL 12: फायनलमध्ये बुमराहला मॅन ऑफ द मॅच, जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता अॅवॉर्ड 

IPL 2019
Updated May 13, 2019 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

IPL 12 Final season: रविवारी आयपीएल १२ व्या सीझनचा फायनलचा रोमांचक सामना रंगला. मुंबई इंडियन्सनं आयपीएलचा किताब चौथ्यांदा मिळवला आहे. दरवर्षीप्रमाणे या सिझनमध्ये ही खेळाडूना अॅवॉर्ड देण्यात आले. 

jasprit bumrah
जसप्रीत बुमराह  |  फोटो सौजन्य: Twitter

IPL 12 Final season Mumbai Indians Winner: ६० सामन्यांपर्यंत चाललेला आयपीएल १२ चा प्रवास रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर समाप्त झाला. रविवारी मुंबई इंडियन्सनं काल चेन्नई विरूद्ध एक धावाने विजय मिळवला. ५१ दिवस चाललेल्या आयपीएलच्या या सीझनमध्ये देश- विदेशातील सगळ्याचे खेळाडूंनी आपला जलवा दाखवला. अशातच आयपीएल १२ व्या सीझनच्या फायनलनंतर ६० सामन्यात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या शानदार प्रदर्शनासाठी सन्मानित करण्यात आलं. जाणून घेऊया आयपीएल १२ च्या सीझनमध्ये कोणाला कोणता अॅवॉर्ड मिळाला. 

मॅन ऑफ द मॅच फायनलः जसप्रीत बुमराह 

आयपीएल १२ व्या सीझनच्या फायनलच्या सामन्यात मुंबईच्या १ रननी रोमांचक विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारा फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहची महत्त्वाची बॉलिंग पराभव- विजयाच्या अंतरात सिद्ध झाली. बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १४ रन देऊन दोन विकेट्स मिळवल्या. यावेळी १३ बॉलमध्ये कोणताही रन घेतला नाही. 

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरः आंद्रे रसेल 

केकेआरसाठी खेळणारा धमाकेदार बॅट्समन आंद्रे रसेलला टूर्नामेंटला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून निवडण्यात आलं.

पर्पल कॅपः इमरान ताहिर 

चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा साऊथ आफ्रिकी स्पिनर इमरान ताहिरनं या सीझनमध्ये २६ विकेट्स घेत टूर्नामेंटचं सर्वश्रेष्ठ बॉलरमध्ये निवडण्यात आलं. ताहिरनं फायनलमध्ये २ विकेट्स घेऊन आपल्याच देशाचा कगिसो रबाडाला या अॅवॉर्डच्या स्पर्धेत मागे टाकलं. रबाडानं दिल्ली कॅपिट्ल्ससाठी खेळताना १२ सामन्यात २५ विकेट्स घेतले. 

ऑरेंज कॅपः डेविड वॉर्नर 

सनरायजर्स हैदराबादसाठी एक वर्षांनंतर वापसी करणारा डेविड वॉर्नरनं १२ सामन्यात ६९२ धावा केल्या. या लीगच्या दरम्यान वॉर्नर स्वदेशी परतला होता. त्यानंतर शेवटपर्यंत त्यांना त्याला अन्य कोणताही बॅट्समन टक्कर देऊ शकला नाही. वॉर्नरनं तिसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. त्यानं २०१५, २०१७ ला देखील हा पुरस्कार जिंकला होता. अशाप्रकारे ऑरेंज कॅप मिळवण्यात हॅट्रिक करणारा वॉर्नर हा पहिला खेळाडू आहे. 

बेस्ट स्ट्राइकरेटः आंद्रे रसेल 

कॅरेबियन बॅट्समन आंद्रे रसेलला बेस्ट स्ट्राइकरेटनं बॅटिंग करण्याचा पुरस्कार मिळाला आहे. रसेलनं आयपीएल १२ मध्ये २०४.८१ च्या स्ट्राइकरेटनं बॅटिंग करत २४९ बॉलमध्ये ५१० रन केले. यावेळी आंद्रे रसेलनं ३१ चौकार आणि ५२ षटकार करत एकूण ८३ वेळा बॉल बाऊंड्रीच्या बाहेर मारला. 

बेस्ट कॅचः केरॉन पोलार्ड 

पोलार्डनं या लीगमध्ये  चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध झालेल्या सामन्यात डीप पॉईटवर उंच उडी मारून एका हातानं सुरेश रैनाची कॅच पकडली होती. ही कॅच सर्वांत सर्वश्रेष्ठ कॅच मानली गेली आहे. 

फेअर प्ले अॅवॉर्डः सनरायजर्स हैदराबाद 

सनरायजर्स हैदराबादची टीमला आयपीएल १२ मध्ये फेअर प्ले अॅवॉर्डनं गौरवण्यात आलं. हैदराबादची टीम १५ सामन्यात १५० गुण मिळवत पहिल्या स्थानावर राहिली. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर केकेआरची टीम आहे. केकेआरनं १४ सामन्यात १३८ गुण मिळवले. 

इमर्जिंग प्लेअर ऑफ आयपीएल २०१९: शुभमन गिल 

कोलकत्ता नाइट रायडर्ससाठी खेळणारा १९ वर्षांचा तरूण बॅट्समन शुभमन गिलला इमर्जिंग प्लेअर ऑफ आयपीएल २०१९ साठी निवडण्यात आलं. त्यानं आयपीएल १२ मध्ये १२४.३० च्या स्ट्राइकरेटनं रन केले आणि टॉप ऑर्डवर खेळताना तीन अर्धशतक देखील केले.

 

सर्वांत वेगानं अर्धशतकः हार्दिक पांड्या 

आयपीएलच्या १२ व्या सिझनमध्ये वेगानं अर्धशतक करण्यात हार्दिक पांड्याचं नाव घेतलं जातं. हार्दिकनं आपल्या ३८ बॉलमध्ये ९१ रनची खेळी करत कोलकत्ता विरूद्ध १७ बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. 


स्टायलिश प्लेअर सिझनः के.एल. राहुल
यंग सुपर स्टार सिझनः राहुल चहर

बेस्ट गाऊंड अॅन्ड पिच अॅवॉर्डः पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन. 

पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला यावर्षी बेस्ट मैदान आणि बेस्ट पिचचा पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. दोघांना २५ लाख रूपये देऊन गौरवण्यात आलं. 

  • परफेक्ट कॅच ऑफ द मॅचः शार्दुल ठाकूर 
  • सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅचः डु- प्लेसिस
  • स्टायलिश प्लेअर ऑफ द मॅचः केरॉन पोलार्ड
  • गेम चेंजरः राहुल चहर
  • मॅन ऑफ द मॅचः जसप्रीत बुमराह

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 12: फायनलमध्ये बुमराहला मॅन ऑफ द मॅच, जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता अॅवॉर्ड  Description: IPL 12 Final season: रविवारी आयपीएल १२ व्या सीझनचा फायनलचा रोमांचक सामना रंगला. मुंबई इंडियन्सनं आयपीएलचा किताब चौथ्यांदा मिळवला आहे. दरवर्षीप्रमाणे या सिझनमध्ये ही खेळाडूना अॅवॉर्ड देण्यात आले. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola