मुंबई: आयपीएल २०२२च्य(ipl 2022) २३व्या सामन्यात पंजाब किंग्सने(punjab kings) सगळ्यात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या(mumbai indians) संघाला १२ धावांनी हरवले. या विजयानंतर जाँटी ऱ्होड्स आणि सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकलीत. या व्हिडिओने चाहत्याची मने जिंकलीत. खरंतर, सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हात मिळवत होते आणि एकमेकांना अभिवादन करत होते. jonty rhodes toches sahin tendulkar feet after punjab kings win against mumbai indians in ipl 2022
अधिक वाचा - CBSE मध्ये जुना पॅटर्नची वापसी !
या दरम्यान पंजाब किंग्सचे फिल्डिंग कोच जाँटी ऱ्होड्स जसा मुंबईचे मेंटाँर सचिनला भेटला त्याने अचानक त्याचे आशीर्वाद घेतले. सचिनने त्याला असे करण्यापासून रोखले. यानंतर जाँटी ऱ्होड्सला त्याने मिठी मारली. आता याचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली.
i missed this last night why is he like this😭 pic.twitter.com/AnlnoyZgOp — m. (@idyyllliic) April 14, 2022
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सने मयांक अग्रवाल आणि शिखर धवनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर निर्धारित षटकांत ५ बाद १९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २० ओव्हरमध्ये ९ बाद १८६ धावा केल्या आणि १२ धावांनी सामना गमावला.
मयांकने ३२ बॉलमध्ये ५२ धावांची खेळी केली. तर धवनने ५० बॉलमध्ये ७० धावा केल्या. तर मुंबईकडून सर्वाधिक धावा ४९ डेवाल्ड ब्रेविसने केल्या. त्याने २५ बॉलमध्ये ४९ धावा केल्या. ओडिन स्मिथने ३० धावांवर ४ विकेट घेतल्या. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव. रोहित शर्माचा संघ अद्याप विजयाचे खाते खोलू शकलेला नाही. यासोबतच पॉईंट टेबलमध्ये ते सगळ्यात शेवटी १०व्या स्थानावर आहेत.
अधिक वाचा - रणबीर-आलियाचं शुभमंगल
बुधवारी पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी रोहित र्मावर २४ लाख रूपयांचा दंड ठोठावला. तर, मुंबई इंडियन्सच्या बाकी खेळाडूंवर ६ लाख अथवा २५ टक्के मॅच ज्यापैकी कमी असेल तितका दंड ठोठावला जाईल. मुंबई इंडियन्सा संघ आणि त्याचा कर्णधार रोहित शर्मावर या आयपीएलच्या हंगामात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार आहे.