Mumbai Indians Chance in IPL ।  ...तर मुंबई इंडियन्स एकही चेंडू न खेळता पडणार बाहेर

मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत. पण मुंबई इंडियन्सचा संघ सामना सुरु होण्यापूर्वीही आयपीएलच्या बाहेर जाऊ शकतो

Kane Williamson can knock out mumbai indians with a toss know the true reason
तर मुंबई इंडियन्स एकही चेंडू न खेळता पडणार बाहेर  

थोडं पण कामाचं

  • मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत.
  • पण मुंबई इंडियन्सचा संघ सामना सुरु होण्यापूर्वीही आयपीएलच्या बाहेर जाऊ शकतो.
  • नाणेफेक ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता मुंबई इंडियनसाठी झाली आहे.

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत. पण मुंबई इंडियन्सचा संघ सामना सुरु होण्यापूर्वीही आयपीएलच्या बाहेर जाऊ शकतो, नाणेफेक ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता मुंबई इंडियनसाठी झाली आहे. (Kane Williamson can knock out mumbai indians with a toss know the true reason)

केकेआरने राजस्थानवर मोठा विजय मिळवला आणि मुंबई इंडियन्सला त्याचा मोठा धक्का बसला. त्यामुळे आता एक गोष्टी अशीही समोर आली आहे की, सामन्याचा एकही चेंडू न पडताच मुंबई इंडियन्सच्या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते.  आता मुंबईचे भविष्य हे कॉइन आणि केन विल्यमसन या दोघांवर अवलंबून असणार आहे. 

काय असणार ते समीकरण... 

मुंबईने प्रथम फलंदाजी केली तर त्यांना पात्र होण्यास संधी आहे. पण त्यांची गोलंदाजी आली तर एक बॉल न टाकताही ते आयपीएलच्या पात्रता फेरीतून बाद होती. 

 मुंबईने प्रथम फलंदाजी करत किती धावा केल्या पाहिजे, अशी समीकरणं आहेत. पण जर मुंबई इंडियन्सची प्रथम गोलंदाजी आली तर काय? कारण जर नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि त्यांनी जर प्रथम फलंदाजी स्वीकारली तर मुंबई इंडियन्सचे काय होणार, याकडे कोणाचे लक्ष्य गेले नाही. पण जर नाणेफेकीनंतर मुंबई इंडियन्सची प्रथम गोलंदाजी आली तर त्यांचे आव्हान तिथेच संपुष्टात येणार आहे. कारण पहिली गोलंदाजी आल्यावर मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी कोणतेही समीकरण नाही

प्रथम फलंदाजीचे गणित 

 प्रथम फलंदाजी आल्यावर जर त्यांनी २००पेक्षा जास्त धावा केल्या तरच त्यांना प्ले-ऑफमध्ये जाता येऊ शकते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सर्वात महत्वाचा असेल. जर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली तर नक्कीच ते प्रथम फलंदाजी स्वीकारतील आणि हैदराबादच्या संघाने मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न करतील,

हैदराबाद नाणेफेक जिंकली तर... 

  हैदराबादने नाणेफेक जिंकली तर मुंबई इंडियन्सला मोठी समस्या जाणवू शकते. कारण हैदराबाद फक्त एकाच निर्णयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न प्रथम फलंदाजी स्विकारून बेचिराख करू शकते. त्यामुळे उद्या सर्वांचे लक्ष हे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या नाणेफेकीवर खिळलेले असेल. त्यामुळे नाणेफेक कोणता संघ जिंकतो आणि त्यानंतर कोणता निर्णय घेतला जातो, यावरच सर्व अवलंबून असणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी