Virat Kohli : IPL मध्ये 'किंग' कोहलीचा 'विराट' विक्रम; आयपीएलच्या इतिहासात हा विक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज

IPL 2023
भरत जाधव
Updated Apr 10, 2023 | 18:56 IST

भारतीय क्रिकेटपटू (Indian cricketer) विराट कोहली (Virat Kohli)याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. कोहलीने कोलकाता (Kolkata)विरुद्ध हा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा इंडियन प्रीमियर लीग, विराट कोहली आपल्या धमाकेदार खेळीने अनेक नवीन विक्रम रचतो.

 'King' Kohli's 'Virat' record in IPL
Virat Kohli : IPL मध्ये 'किंग' कोहलीचा 'विराट' विक्रम  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटने 82 धावांची नाबाद खेळी केली होती.
  • विराट कोहलीने आतापर्यंत फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल सामने खेळले आहेत.
  • कोहलीने घरच्या मैदानाव्यतिरिक्त बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

Virat Kohli IPL Record : भारतीय क्रिकेटपटू (Indian cricketer) विराट कोहली (Virat Kohli)याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. कोहलीने कोलकाता (Kolkata)विरुद्ध हा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा इंडियन प्रीमियर लीग, विराट कोहली आपल्या धमाकेदार खेळीने अनेक नवीन विक्रम रचतो. आता आयपीएलमध्ये विराट कोहलीने होम अवे मॅचेस म्हणजेच घरच्या मैदाना व्यतिरिक्त बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये 3000 धावांचा टप्पा पूर्ण केल्याचा विक्रम कोहलीने केला आहे. हा हा विक्रम करणारा 'किंग कोहली'  एकमेव खेळाडू ठरला आहे. ('King' Kohli's 'Virat' record in IPL;Kohli will be the first batsman to achieve this record  in history of IPL)

अधिक वाचा  : दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आता आणखी एक विक्रम झाला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम कोणत्याही फलंदाजाच्या नावावर नाही. आयपीएलमध्ये विराट कोहलीने होम अवे मॅचेस म्हणजेच घरच्या मैदानाव्यतिरिक्त बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. इतकंच नाही तर आयपीएलमध्ये याआधीही  विराटच्या नावे विक्रम आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 

अधिक वाचा  :लग्नाआधी हार्दिक पांड्याचे इतक्या जणींसोबत अफेयर्स, ब्रेकअप झाल्यावर...

विराट कोहलीने आतापर्यंत फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (Royal Challengers Bangalore)आयपीएल सामने खेळले आहेत. तो पहिल्या IPL पासून ते यंदाच्या IPL 2023 पर्यंत RCB संघासाठी खेळत आहे. या कालावधीत त्याने 225 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 217 डावांमध्ये विराटने 36.55 च्या सरासरीने आणि 129.46 च्या स्ट्राइक रेटने 6,727 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने पाच शतके आणि 50 अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत.

अधिक वाचा  : लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं

 


कोहलीकडून आरसीबीला खूप अपेक्षा

आरसीबीला (RCB)आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीकडून खूप आशा आहेत. बर्‍याच वर्षांनंतर विराट यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. यावेळी कोहलीच्या फलंदाजीत आत्मविश्वास दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटने 82 धावांची नाबाद खेळी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी