KKR vs RR: भर सामन्यात भडकला श्रेयस अय्यर, वेंकटेशवर काढला राग

IPL 2022
Updated Apr 19, 2022 | 12:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर सहकारी खेळाडू वेंकटेश अय्यरवर ओरडताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 

shreyas iyyer
भर सामन्यात भडकला श्रेयस अय्यर, वेंकटेशवर काढला राग 
थोडं पण कामाचं
  • सामन्यात एकवेळ अशीही होती जेव्हा कर्णधार श्रेयस अय्यर सामन्यातच खूप भडकला
  • सहकारी खेळाडू वेंकटेश अय्यरवर राग काढताना दिसला. 
  • आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (rajasthan royals)यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात केकेआरला हंगामात चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाताचा ७ धावांनी पराभव झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केकेआरला विजयासाठी २१८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र केकेआरचा संघ २१० धावांवर ऑलआऊट झाला. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. KKR captain shreyas iyyer shout on venkatesh in match

अधिक वाचा - तर दिल्ली पोलिसांविरोधात युद्ध पुकारु, विहिंपची दर्पोक्ती

सामन्यात एकवेळ अशीही होती जेव्हा कर्णधार श्रेयस अय्यर सामन्यातच खूप भडकला आणि सहकारी खेळाडू वेंकटेश अय्यरवर राग काढताना दिसला. 

वेंकटेशवर भडकला श्रेयस अय्यर

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १६व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर वेंकटेशने डीप बॅकवर्ड पॉईंटवर शॉट खेळला. यावर श्रेयसला दोन रन्स काढायचे होते. मात्र वेंकटेशने त्यास नकार दिला. वेंकटेशकडून दुसरा रन्स काढण्यास नकार दिल्यामुळे श्रेयस खूप चिडला होता आणि ओरडून वेंकटेशवर राग काढण्यास सुरूवात केली. हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाले असून आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

येथे पाहा व्हिडिओ

अय्यरने केली मोठी खेळी

श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ५१ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. मात्र अय़्यर संघाला सामना जिंकून देऊ शकला नाही. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद २१७ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून जोस बटलरने शानदार १०३ धावांची खेळी केली आणि युझवेंद्र चहलने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देत ५ विकेट मिळवल्या. याचा पाठलाग करताना केकेआरला ७ विकेटनी पराभव स्वीकारावा लागला.

अधिक वाचा -  राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणार

केकेआरचा सलग तिसरा पराभव

आयपीएल २०२२मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजयी सुरूवात केली होती. संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. मात्र केकेआरला यापैकी केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ४ सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी