मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात एका क्षणी त्यांचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्याने संघर्ष करत होते, पण पॅट कमिन्सने (15 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा) तो येताच सर्व समीकरणे बदलली. बुधवारी केकेआरसमोर १६२ धावांचे आव्हान होते. आणि केकेआरने 101 धावांवर पाचवी विकेट गमावली तेव्हा पॅट कमिन्स फलंदाजीला आला. आणि मुंबई पहिला विजय नोंदवणार असे वाटत होते, पण पुढच्या 17 चेंडूत कमिन्सने मुंबईच्या आशा धुळीस मिळवत इतिहास रचला. (KKR vs MI: Andre Russell Fell, no tension .... Pat Cummins is ... KKR got a new finisher)
अधिक वाचा : हे आहेत ८ खेळाडू ज्यांच्या करिअरचा शेवट झाला वाईट
लांब फटके खेळण्याच्या प्रयत्नात कोलकाताच्या फलंदाजांनी विकेट गमावल्या. अजिंक्य रहाणे (7) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (10) पॉवरप्लेच्या आत बाद झाले. हे दोन्ही फलंदाज अनुक्रमे टायमल मिल्स (३८ धावांत २ बळी) आणि सॅम्स (५० धावांत १ बळी) यांनी शॉर्ट पिच चेंडूंवर बाद केले.
अधिक वाचा : IPL 2022: पुण्याला जाताना रस्त्यात भेटले ट्रॅफिक; टाईमपाससाठी सचिनने धरला मराठी गाण्यावर ठेका
पहिल्या सहा षटकांनंतर केकेआरची धावसंख्या दोन बाद 35 अशी होती. धावगती कमी होत असताना बिलिंग्जने मुरुगन अश्विन (२५ धावांत २ बळी) चेंडू बासिल थम्पीच्या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्या निश्चित केली. मात्र, अश्विनने लवकरच त्याला प्रत्युत्तर दिले. केकेआरला 10 षटकांनंतर तीन विकेट्सवर केवळ 67 धावा करता आल्या. नितीश राणा (आठ) याने थर्ड मॅन क्षेत्रात मिल्सला षटकार खेचून आपले खाते उघडले, परंतु लवकरच अश्विनच्या चेंडूवर मिडविकेटवर झेलबाद झाला.
अधिक वाचा : IPL 2022: रोहित शर्मा खेळाडूंना देतो शिव्या; ज्युनिअर खेळाडूच्या आरोपाने खळबळ
आता आंद्रे रसेल (11) क्रीजवर होता, त्याने अश्विनची गुगली सहा धावांवर पाठवली, पण मिल्सने त्याचे वादळ झटपट थोपवले. कमिन्सने मिल्स, जसप्रीत बुमराह आणि सॅम्स यांना षटकार ठोकल्याने केकेआर चाहत्यांना रसेलच्या बाद झाल्याचा विसर पडला. दरम्यान, दुसऱ्या टोकाला विकेट राखणाऱ्या व्यंकटेशने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून मुंबई इंडियन्सने चार गडी गमावून १६१ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. 15 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या 3 बाद 83 अशी होती. सूर्यकुमार (36 चेंडूत 52, पाच चौकार, दोन षटकार) आणि टिळक (27 चेंडूत नाबाद 38, तीन चौकार, दोन षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. मुंबईने शेवटच्या पाच षटकांत ७८ धावांची भर घातली, त्यात किरॉन पोलार्डच्या पाच चेंडूत नाबाद २२ धावा होत्या. केकेआरचा सर्वात यशस्वी गोलंदाज पॅट कमिन्स (४९ धावांत २ बळी) याच्या शेवटच्या षटकात त्याने तीन षटकार ठोकले. उमेश यादवने 25 धावांत एक विकेट घेतली.