IPL 2019: राजस्थानचा रोमांचक विजय, कोलकत्ताचा लागोपाठ सहावा पराभव

IPL 2019
Updated Apr 26, 2019 | 09:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Premier League 2019 Season 12: राजस्थान रॉयल्सनं थरारक असा विजय मिळवला आहे. तर कोलकत्ता नाईट रायडर्सचा लागोपाठ सहावा पराभव आहे. या दोन्ही टीममध्ये कसा झाला रोमांचक सामना त्यावर एक नजर टाकूया.

KKR vs RR
राजस्थानचा रोमांचक विजय, कोलकत्ताचा लागोपाठ सहावा पराभव  |  फोटो सौजन्य: Twitter

KKR vs RR Indian Premier League 2019: राजस्थान रॉयल्सनं आयपीएल १२ मध्ये गुरूवारी कोलकत्ता नाईट रायडर्सला तीन विकेट्सनी पराभूत केलं आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात राजस्थाननं चार बॉल राखत आपल्या विजयाचा झेंडा रोवला. कोलकत्ताच्या टीमची ही लागोपाठ सहावा पराभव आहे. कोलकत्तानं राजस्थाला १७६ धावांचं लक्ष्य दिलं होतं. कोलकत्ताचं आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या राजस्थाननं १९.०२ ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावत आपलं लक्ष्य प्राप्त केलं. राजस्थानला प्रसिद्ध कृष्णा याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांची गरज होती. स्ट्राइकवर असलेल्या जोफ्रा आर्चरनं पहिल्या बॉलवर चौकार आणि त्याच्या पुढच्या बॉलवर षटकार ठोकून आपल्या टीमला विजयी केलं. 

राजस्थानसाठी सर्वाधिक धावा रियान पराग(४७) नं केले. त्यानं ३१ बॉलमध्ये आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार लगावले. याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे (३४), संजू सॅमसन (२२), श्रेयस गोपाल (१८) , बेन स्टोक्स(११), स्टुअर्ट बिन्नी(११) आणि स्टिव्ह स्मिथनं २ धावाचं योगदान दिलं. तर जोफ्रो आर्चर १२ बॉलमध्ये २७ धावा आणि जयदेव उनादकट खातं न खोलता नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. कोलकत्ताच्या टीमकडून पियूष चावलानं तीन, सुनीर नरेननं दोन तर प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट घेतली. 

या विजयानंतर राजस्थानच्या टीमची प्लेऑफमध्ये खेळण्याची आशा जिवंत झाली आहे. राजस्थानच्या टीमनं ११ सामन्यात चार विजय मिळवल्यानंतर ८ गुणसंख्येसोबत पॉईट्स टेबलमध्ये सातव्या नंबरवर आहेत. कोलकत्ता ११ सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवल्यानंतर ८ गुणसंख्येनं पॉईट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकत्तानं सिझनची सुरूवात शानदार प्रदर्शन करत केली होती. मात्र त्यानंतर ही टीम विजयाच्या पटरीवरून खाली घसरताना दिसतेय. 

याआधी कोलकत्तानं पहिल्यांदा बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १७५ धावाचं लक्ष्य उभारलं. कोलकत्तासाठी सर्वांत जास्त धावा कॅप्टन दिनेश कार्तिक (९७ नाबाद) नं बनवलं. दिनेशनं ५० बॉलमध्ये आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. दिनेश कार्तिकची ही आयपीएलमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. कोलकत्ताची सुरूवात अत्यंत वाईट झाली आणि त्यांची पहिली विकेट ही शून्यावरच गेली. सलामी बॅट्समन क्रिस लिननंला वरूण एरोननं आपलं शिकार बनवलं. एरोननं त्याला पहिल्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर बोल्ड केलं. 

त्यानंतर दुसरा झटका शुभमन गिल( १४) च्या रूपानं लागला. त्याला एरोनं पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये आऊट केलं. शुभमन १४ बॉलच्या खेळीत केवळ २ धावा करू शकला. नितीश राणा (२१) टीमच्या अपेक्षेप्रमाणे चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. नितीशला ९ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलमद्ये श्रेयस गोपालनं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 

कोलकत्ताची चौथी विकेट सुनील नरेन(११) याची गेली. दरम्यान केकेआरसाठी ओपनिंग करणारा नरेन यावेळी पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. त्यानं ८ बॉलमध्ये १ चौकार आणि १ षटकार टोटावले. मात्र १२ व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलमध्ये नरेनं आऊट झाला. तोपर्यंत केकेआरचे चार विकेट्स जाऊन एकूण ८० धावसंख्या झाली होती. 

येथून कार्तिकनं टीमची कमान सांभाळली आणि शेवटपर्यंत टिकून राहिला. त्यानं आंद्रे रसेल (१४) सोबत पाचव्या विकेटसाठी ३९ धावाची भागेदारी करत टीमला सांभाळलं. तूफानी बॅटिंग करणारा रसेल काल त्यांच्या फॉर्ममध्ये दिसला नाही. रसेलनं १४ बॉलमध्ये आपल्या खेळीत केवळ १ चं षटकार मारला. त्याला ओशाने थॉमसनं १७ व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलमध्ये आऊट करत पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 

त्यानंतर कोलकत्ताला सहावा झटका कार्लोट ब्रेथवेट (५) च्या रूपानं लागला. ब्रेथवेटला १८ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जयदेव उनादकटनं आऊट केलं. ब्रेथवेटची विकेट १३१ धावसंख्या असताना गेली. कार्तिकनं त्यासोबत रिंकू सिंह (नाबाद ३) सोबत सातव्या विकेटपर्यंत ४४ धावांची भागेदारी करत टीमचा स्कोर मजबूत केला. 

कार्तिकनं ३५ बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे कार्तिकचं आयपीएलमध्ये १८ वं अर्धशतक आहे. कार्तिक पहिल्यांदा १० बॉलमध्ये केवळ ३ रन बनवू शकला होता. त्यानंतर त्यानं ४० बॉलमधअये ९४ धावा केल्या. कोलकत्तानं शेवटच्या ४ ओव्हरमध्ये ६० धावा केल्या. राजस्थानकडून वरून एरोननं दोन तर श्रेयस गोपाल, ओशाने थॉमस आणि जयदेव उनादकट यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतल्या. 

राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून पहिल्या बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थाननं आपल्या टीममध्ये दोन बदल केले. राजस्थाननं हॅरी गर्ने आणि केसी करियप्पाच्या बदली कार्लोस ब्रेथवेट आणि प्रसिद्ध कृष्णा याला शेवटच्या क्षणी सहभागी केलं. तर कोलकत्तानं देखील आपल्या टीममध्ये दोन बदल केलं. त्यात एश्टन टर्नर आणि धवल कुलकर्णीच्या जागी ओशाने थॉमस आणि वरूण एरोनला संधी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: राजस्थानचा रोमांचक विजय, कोलकत्ताचा लागोपाठ सहावा पराभव Description: Indian Premier League 2019 Season 12: राजस्थान रॉयल्सनं थरारक असा विजय मिळवला आहे. तर कोलकत्ता नाईट रायडर्सचा लागोपाठ सहावा पराभव आहे. या दोन्ही टीममध्ये कसा झाला रोमांचक सामना त्यावर एक नजर टाकूया.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola