KKR च्या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम, MI चा 52 धावांनी पराभव, कमिन्सने बुमराहला मागे टाकले

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated May 10, 2022 | 06:51 IST

IPL 2022 MI vs KKR : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 9 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 17.3 षटकांत 113 धावांवर गारद झाला.

KKR wins playoff hopes, MI loses by 52 runs, Cummins beat Bumrah
KKR च्या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम, MI चा 52 धावांनी पराभव, कमिन्सने बुमराहला मागे टाकले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडिया टीम नववा सामनाही हरली
  • कोलकाताच्या प्लेऑफच्या आशा अबाधित राहिल्या
  • गुणतालिकेत संघ नवव्यावरून सातव्या स्थानावर पोहोचला

मुंबई : आयपीएल 2022 च्या 56 व्या सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 52 धावांनी पराभव केला. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकात 9 गडी गमावून 165 धावा केल्या. (KKR wins playoff hopes, MI loses by 52 runs, Cummins beat Bumrah)

अधिक वाचा : 

IPL 2022: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करताना चार षटकात 10 धावा देत पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 17.3 षटकांत 113 धावांवर गारद झाला. बुमराहच्या कामगिरीवर पॅट कमिन्स जोरदारपणे उतरला. मुंबईच्या डावाच्या 15व्या षटकात कमिन्सने तीन बळी घेतले. त्याने अर्धशतक झळकावत इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

अधिक वाचा : 

Isha Negi:ऋषभ पंतची फलंदाजी पाहून आनंदाने नाचू लागली गर्लफ्रेंड Isha Negi,व्हिडिओ व्हायरल

या विजयासह कोलकाताच्या प्लेऑफच्या आशा अबाधित राहिल्या आहेत. कोलकाताचे आता १२ सामन्यांतून पाच विजय आणि सात पराभवांसह १० गुण आहेत. गुणतालिकेत संघ नवव्यावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. मुंबईचा या मोसमातील हा नववा पराभव ठरला.

अधिक वाचा : 

Virat Kohli IPL 2022: झुकलेले खांदे आणि संथ चाल, पॅव्हेलियनमध्ये असा निराश परतला कोहली

संघाने 11 पैकी दोन सामने जिंकले असून चार गुणांसह 10व्या स्थानावर कायम आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबईसाठी हा सर्वात खराब हंगाम ठरला आहे. यापूर्वी 2009, 2014 आणि 2018 मध्ये संघाने प्रत्येकी आठ सामने गमावले होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मोसमात नऊ सामने हरले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी