IPL 2022: के.एल राहुलने झळकावले IPL मधील तिसरे शतक, मुंबईला विजयासाठी २०० धावांचे तगडे आव्हान

IPL 2022
Updated Apr 16, 2022 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

KL Rahul IPL |  सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. मात्र यंदाचा आयपीएल हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्या विजयाचे खाते देखील उघडू शकला नाही.

KL Rahul scores third century in IPL, mumbai need to 200 runs for win
के.एल राहुलने झळकावले IPL मधील तिसरे शतक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • मुंबईला विजयासाठी २०० धावांचे तगडे आव्हान.
  • के.एल राहुलने झळकावले IPL मधील तिसरे शतक.

KL Rahul IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. मात्र यंदाचा आयपीएल हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्या विजयाचे खाते देखील उघडू शकला नाही. सध्या सुरू असलेल्या मुंबई आणि लखनऊच्या सामन्यात देखील याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुलने आपल्या १०० व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावून मुंबईच्या अडचणीत वाढ केली आहे. राहुलने ५९ चेंडूत १०३ धावांची शतकीय खेळी करून मुंबईला विजयासाठी २०० धावांचे तगडे आव्हान दिले आहे. (KL Rahul scores third century in IPL, mumbai need to 200 runs for win).

अधिक वाचा : जाणून घ्या ईस्टर संडे या सणाचे महत्त्व

दरम्यान, नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय खरा ठरवण्यात मुंबईच्या संघाला अपयश आले. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे. राहुल व्यतिरिक्त लखनऊच्या संघातील फलंदाजांनी साजेशी खेळी केली. मनीष पांडे (३८), क्विटन डिकॉक (२४) आणि दिपक हुड्डा (१५) अशी फलंदाजी पाहायला मिळाली. 

मुंबईच्या गोलंदाजांकडून निराशाजनक खेळी पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळला तर कोणत्याच गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. बुमराह प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्यात यशस्वी झाला मात्र त्याला गडी बाद करण्यात यश आले नाही. 

मुंबई विजयाचं खातं उघडणार? 

आयपीएल २०२२ मध्ये मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत आणि ते सर्व गमावले आहेत. मुंबईचा संघ लखनऊविरुद्धच्या सामन्यात आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मुंबईने यापूर्वीही देखील असा चमत्कार करून दाखवला आहे. संघाने पहिले ६ सामने गमावून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, त्यामुळे रोहित ब्रिगेड या आजच्या सामन्याच्या आधीच्या सामन्याची पुनरावृत्ती करेल का हे पाहण्याजोगे असेल. मुंबईच्या संघाला विजयासाठी २० षटकांत २०० धावा करणे गरजेचे आहे, त्यामुळे मुंबईचा संघ आपले विजयाचे खाते उघडणार का हे पाहण्याजोगे असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी