जाणून घ्या आयपीएलमधील 2021मधील सर्व 8 कर्णधारांचे वय, कोण आहे सर्वात तरुण आणि सर्वात वरिष्ठ

IPL 2021 Oldest Captains: आयपीएलच्या 14व्या पर्वातला पहिला सामना आज रंगणार आहे. या पर्वात सामील असलेल्या सर्व 8 संघांचे कर्णधार कोण कोण आहे आणि यामधील सर्वात तरुण आणि वरिष्ठ कोण आहे, जाणून घ्या.

IPL captains
जाणून घ्या आयपीएलमधील 2021मधील सर्व 8 कर्णधारांचे वय, कोण आहे सर्वात तरुण आणि सर्वात वरिष्ठ 

थोडं पण कामाचं

 • आयपीएल 2021मधील सर्व 8 कर्णधारांचे वय
 • कोणता कर्णधार आहे सर्वात तरुण कर्णधार
 • कोणत्या आयपीएल कर्णधाराचे वय आहे सर्वात जास्त

IPL 2021 । नवी दिल्लीः आयपीएल 2021मध्ये (IPL 2021) पुन्हा एकदा 8 संघ (teams) पूर्ण जोमाने विजेतेपदासाठी (championship) एकमेकींविरुद्ध उभ्या राहणार आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) संघांदरम्यान पहिला सामना मालिकेच्या (series) सुरुवातीला होणार आहे आणि 30 मेपर्यंत टी-20तील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट मालिकेचा हा प्रवास चालणार आहे. यावेळीही या 8 संघांचे कर्णधार (captains) कोण आहेत आणि त्यांचे वय (age) किती आहे, जाणून घ्या.

ऋषभ पंतच्या नावावर सर्वात तरुण आयपीएल कर्णधाराचा विक्रम

आयपीएलच्या नव्या पर्वात सर्वात युवा कर्णधाराचा विक्रम काहीच दिवसांपूर्वी ऋषभ पंतने आपल्या नावावर केला आहे. दुखापतग्रस्त कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार तो झाला आहे. रिषभ पंत 23व्या वर्षी या पर्वातील सर्वात कमी वयाचा कर्णधार झाला आहे. जाणून घ्या सर्वात तरुण ते सर्वाधिक वयस्कर कर्णधारापर्यंत पूर्ण यादी.

जाणून घ्या कोणत्या कर्णधाराचे वय किती आहे

 1. महेंद्र सिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्स) - वय 39 वर्षे 276 दिवस
 2. इयन मॉर्गन (कोलकाता नाइट रायडर्स) - वय 34 वर्षे 211 दिवस
 3. डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद) - वय 34 वर्षे 164 दिवस
 4. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) - वय 33 वर्षे 344 दिवस
 5. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) - वय 32 वर्षे 155 दिवस
 6. केएल राहुल (पंजाब किंग्स) - वय 28 वर्षे 356 दिवस
 7. संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) - वय 26 वर्षे 149 दिवस
 8. रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स) - वय 23 वर्षे 187 दिवस

हे झाले सध्याच्या पर्वातील कर्णधारांबद्दल. जर आयपीएलच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर या यादीत विराट कोहलीचे नाव दाखल आहे ज्याने वयाच्या 22व्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले होते.

हे आहेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे कर्णधार

1. विराट कोहली - 22 वर्षे 187 दिवस

2. स्टीव स्मिथ - 22 वर्ष 344 दिवस

3. सुरेश रैना - 23 वर्ष 112 दिवस

4. श्रेयस अय्यर - 23 वर्ष 141 दिवस

5. रिषभ पंत - 23 वर्ष 144 दिवस

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात युवा कर्णधार म्हणून विक्रम नोंदवणारे सर्वजण सध्या सक्रीय खेळाडू आहेत. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने तो चालू पर्वात दिसणार नाही तर स्टीव्ह स्मिथ आणि सुरेश रैना यांच्याकडे यावेळी कर्णधारपद नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी