KKR vs DC Playing XI, IPL 2021, 29 April: कोलकाता आणि दिल्ली आमनेसामने, कोणाला मिळू शकते संधी

IPL 2021
Updated Apr 29, 2021 | 13:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Dream 11: गुरुवारी आयपीएल २०२१मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. जाणून घ्या या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते. 

kolkata vs delhi
कोलकाता आणि दिल्ली आमनेसामने, कोणाला मिळू शकते संधी 

थोडं पण कामाचं

  • कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.
  • केकेआर आपल्या विजयी ११ सह मैदानावर उतरेल कारण त्यांच्याकडे दमदार खेळाडू आहेत.
  • दिल्लीने पंजाबविरुद्ध अश्विनच्या जागी इशांत शर्माला संधी दिली होती. जो संघात टिकून राहू शकतो. 

अहमदाबाद: आज कोलकाता नाईट रायडर्स(kolkata knight riders) आणि दिल्ली कॅपिटल्स(delhi capitals) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१(ipl 2021)मधील २५वा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील सातवा सामना आहे. कोलकाताने ६ सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर ४ सामने गमावलेत. दुसरीकडे इतक्याच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला तर दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. कोलकाताने आपल्या गेल्या सामन्यात पंजाब किंग्सला ५ विकेटनी मात दिली होती. तर दिल्लीला आरसीबीविरुद्ध एका धावेने पराभव सहन करावा लागला होता. दोन्ही संघात असे काही खेळाडू आहेत जे आपल्या एकट्याच्या जीवावर संपूर्ण सामन्याचे रूप पलटवू शकतात.  

दोघांच्या प्लेईंग ११मध्ये होणार बदल?

कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपला मागचा सामना याच मैदानावर खेळला होता. कोलकाताना पंजाब किंग्सविरुद्ध ५ विकेटनी विजय मिळवला होता तर दिल्लीला केवळ एका धावेने पराभवास तोंड द्यावे लागले होते. केकेआर आपल्या विजयी ११ सह मैदानावर उतरेल कारण त्यांच्याकडे दमदार खेळाडू आहेत. दुसरीकडे पराभवानंतरही दिल्लीही प्लेईंग ११ कायम ठेवू शकते. दिल्लीने पंजाबविरुद्ध अश्विनच्या जागी इशांत शर्माला संधी दिली होती. जो संघात टिकून राहू शकतो. 

केकेआर-डीसीमध्ये कोणाचे पारडे जड?

आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध कोलकाता संघाचे पारडे जड आहे. दोन्ही संघ आतापर्यंत २७वेळा भिडलेत. यात १४वेळा कोलकाताला विजय मिळवता आला तर दिल्लीच्या संघाला १२ सामन्यांत विजय मिळवता आला. एका सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या हंगामात दोन्ही संघ बरोबरीत होते. दोन्ही संघांनी आयपीएल २०२०मध्ये दोनवेळा समोरासमोर आले आणि एका एका सामन्यात विजय मिळवला. दिल्लीने १८ धावांनी हरवले तर कोलकाताने ५९ धावांनी मात केली होती. अशातच दोन्ही संघामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल. 

कोलकाताचा संभाव्य संघ (KKR probable playing XI)

इयोन मोर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुनील नरेन, पॅट कमिंस, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्‍णा, वरुण चक्रवर्ती. 

दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ (DC probable playing XI)

रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, आवेश खान आणि कगिसो रबाडा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी