KKR won : पाच सिक्स आणि KKR चा विजय, रिंकू झाला हिरो

IPL 2023
रोहन जुवेकर
Updated Apr 10, 2023 | 18:57 IST

Kolkata Knight Riders won by 3 wkts against Gujarat Titans in  13th Match of IPL 2023 at Ahmedabad : विसाव्या ओव्हरच्या शेवटच्या पाच बॉलवर सिक्स मारत रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला.

KKR won
पाच सिक्स आणि KKR चा विजय, रिंकू झाला हिरो  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • KKR won : पाच सिक्स आणि KKR चा विजय, रिंकू झाला हिरो
  • विसाव्या ओव्हरच्या शेवटच्या पाच बॉलवर सिक्स
  • 2 बाद 28 धावा ते 7 बाद 207 धावा

Kolkata Knight Riders won by 3 wkts against Gujarat Titans in  13th Match of IPL 2023 at Ahmedabad : विसाव्या ओव्हरच्या शेवटच्या पाच बॉलवर सिक्स मारत रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. कोलकाताने गुजरात टायटन्स विरुद्धची मॅच 3 विकेट राखून जिंकली. याआधी गुजरात टायटन्सचा कॅप्टन राशिद खान याने कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेल (1 धाव), सुनिल नरेन (0 धावा) आणि शार्दुल ठाकुर (0 धावा) या तिघांना बाद करून हॅटट्रिक केली होती. पण त्याच्या प्रयत्नांवर रिंकूने पाणी टाकले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स ही आयपीएल 2023 ची तेरावी मॅच झाली. या मॅचमध्ये टॉस जिंकून गुजरातने बॅटिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करणाऱ्या गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 बाद 204 धावा केल्या. विजय शंकरने नाबाद 63 तर साई सुदर्शनने 53 धावा केल्या. शुभमन गिलने 39, वृद्धिमान साहाने 17, अभिनवने 14, चक्कीवालाने नाबाद 2 धावा केल्या. कोलकाताकडून सुनिल नरेनने 3 तर सुयश शर्माने 1 विकेट घेतली. 

धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था 16.3 ओव्हरमध्ये 7 बाद 155 अशी होती. जिंकण्यासाठी कोलकाताला 21 बॉलमध्ये 50 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्याकडे फक्त 3 विकेट उरल्या होत्या. रिंकू सिंग आणि उमेश यादव ही जोडी मैदानात होती. कोलकातासाठी मॅच जिंकणे कठीण आहे असे चित्र निर्माण झाले होते. पण रिंकूने विसाव्या ओव्हरमध्ये पाच सिक्स मारत चमत्कार केला. 

2 बाद 28 धावा ते 7 बाद 207 धावा

कोलकाताची अवस्था सुरुवातीला 2 बाद 28 धावा अशी झाली होती. पण वेंकटेश अय्यर आणि नितीष राणा यांनी मैदानावर ठामपणे उभे राहून परिस्थिती सावरली. राणा बाद झाला त्यावेळी कोलकाताने 13.1 ओव्हरमध्ये 3 बाद 128 धावा एवढी मजल मारली होती. पुढे रिंकूने चमत्कार केला आणि कठीण वाटत असलेली मॅच जिंकून सर्वांना चकीत केले. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाताकडून रहमानुल्लाह गुरबाझने 15, जगदीसनने 6, वेंकटेश अय्यरने 83, नितीष राणाने 45, रिंकू सिंगने नाबाद 48, आंद्रे रसेलने 1, सुनिल नरेनने 0, शार्दुल ठाकुरने 0, उमेश यादवने नाबाद 5 धावांचे योगदान दिले. गुजरातकडून राशिद खानने 3, अल्जारी जोसेफने 2 तर मोहम्मद शमी आणि जोशुआ लिटिलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

IPL 2023 मध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या महिला

IPL मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मिस्ट्री गर्ल्स

फ्लॉवर नाही फायर आहेत IPL च्या या खेळाडूंच्या बायका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी