मुंबई: आयपीएल २०२२(ipl 2022)मधील नवा संघ लखनऊ सुपरजायंट्सचा(lucknow supergiants) कर्णधार लोकेश राहुलला(lokesh rahul) बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आयपीएलचे कोड ऑफ कंडक्टचे(code of conduct) उल्लंघन केल्याप्रकरणात दोषी आढळला आहे आणि त्याला मोठा दंड बसला आहे. लोकेश राहुलशिवाय टीमचा मोठा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसलाही आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहे. lokesh rahul fined for breaks ipl code of conduct
अधिक वाचा - उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात हाणामारी
लोकेश राहुलवर कोड ऑफ कंडक्टच्या लेव्हल १चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या सामना फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या विधानात म्हटले की लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणात दोषी आढळला आहे. यामुळे त्याला सामना फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलने आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल १चे उल्लंघन केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर मार्कस स्टॉयनिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर अंपायरवर भडकलेला दिसला. यामुळे स्टॉयनिसलाही सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणात फटका बसला आहे. मार्कस स्टॉयनिसनेनही लेव्हल १ अंतर्गतचा गुन्हा मान्य करत त्याच्यावरील बंदी स्वीकारली आहे. स्टॉयनिस या सामन्यात १५ चेंडूत २४ धावा करत बाद झाला होता.
अधिक वाचा - आजचे पंचांग : बुधवार २० एप्रिल २०२२
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध लखनऊला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लोकेश राहुलने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ २० ओव्हरमध्ये १६३ धावा करू शकला. या हंगामातील लखनऊचा हा तिसरा पराभव होता. त्यांनी आतापर्यंत या हंगामात ७ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ३मध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला आहे.