LSG: लखनऊने या खेळाडूमागे पाण्यासारखे घालवले ९.२ कोटी रूपये

IPL 2022
Updated May 16, 2022 | 16:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचा खेळ या हंगामात खूप चांगला राहिला. मात्र त्याच्या विस्फोटक ऑलराऊंडरने सर्वांना आपल्या खेळाने निराश केले.

marcus
LSG: लखनऊने या खेळाडूमागे पाण्यासारखे घालवले ९.२ कोटी रूपये 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस आपल्या जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जातो.
  • मात्र या हंगामात त्याचा खेळ तितकासा चांगला होऊ शकला नाही.
  • मार्कस स्टॉयनिसच्या फलंदाजीदरम्यान एकही अर्धशतक अद्याप निघालेले नाही.

मुंबई: आयपीएलमध्ये(ipl) पहिल्यांदा खेळत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्ससाठी(lucknow supergiants) हा हंगाम आतापर्यंत चांगला राहिला आहे. लखनऊचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफायच्या जवळ आहे. मात्र संघासाठी गेले २ सामने खूपच खराब गेले. त्यांना गेल्या २ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊसाठी या हंगामातील एका खेळाडूची कामगिरी खूपच खराब राहिली. या खेळाडूला संघाने ९.२ कोटींना रिटेन केले होते. LSG player marcus stoinis fiop in ipl 2022

अधिक वाचा - या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका.

९.२ कोटीच्या खेळाडूंचा खराब परफॉर्मन्स

लखनऊ सुपर जायंट्सने मेगा लिलावाआधी केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिश्नोई यांना खरेदी केले होते. मार्कस स्टॉयनिसला संघाने ९.२ कोटींना रिटेन केले होते. मात्र मार्कस स्टॉयनिसला खरेदी करण्याचा निर्णय संघासाठी योग्य सिद्ध झालेला नाही. मार्कस स्टॉयनिस या हंगामात सातत्याने फ्लॉप ठरतोय. मार्कस स्टॉयनिस या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर फ्लॉप ठरला आहे. 

२१.००च्या सरासरीने करतोय धावा

आयपीएल २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत या सामन्यांमध्ये त्याने २१.००च्या सरासरीने १४७ धावा केल्या आहे. या हंगामातील त्याचा बेस्ट स्कोर नाबाद ३८ राहिला आहे. मार्कस स्टॉयनिस गोलंदाजीतही लखनऊ सुपर जायंट्ससाठी काही करू शकला नाही. स्टॉयनिसने या ९ सामन्यांत केवळ १ विकेट मिळवला आहे आणि ११.२०च्या सरासरीने धावा दिल्या. 

अधिक वाचा - सत्तारांनी सांगितले बाबरी पडली तेव्हा कुठे होते दानवे

एक अर्धशतकही नाही ठोकले

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस आपल्या जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र या हंगामात त्याचा खेळ तितकासा चांगला होऊ शकला नाही. मार्कस स्टॉयनिसच्या फलंदाजीदरम्यान एकही अर्धशतक अद्याप निघालेले नाही. स्टॉयनिसने गेल्या हंगामातही अर्धशतक ठोकले नव्हते. आयपीएल २०२१मध्ये मार्कस स्टॉयनिस संघाचा भाग होता. यावेळेस लखनऊच्या संघाने त्याला खरेदी केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी