MI vs LSG: मुंबईवरील विजयानंतर लखनऊच्या संघातील खेळाडूंना मोठा झटका

IPL 2022
Updated Apr 25, 2022 | 12:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

MI vs LSG:मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्च्या संघाने ३६ धावांनी मात दिली. मात्र या विजयानंतरही लखनऊच्या खेळाडूंवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. 

lokesh rahul
मुंबईवरील विजयानंतर लखनऊच्या संघातील खेळाडूंना मोठा झटका 
थोडं पण कामाचं
  • लखनऊ सुपर जायंट्स (LSG)चा कर्णधार लोकेश राहुलवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल सामन्यात धीम्या ओव्हर गतीसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • या हंगामातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा राहुलवर धीम्या ओव्हर गतीसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
  • पहिल्यांदा त्याच्यावर १२ लाखांचा दंड ठोठावला होता. 

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सचा(Lucknow Super Giants) कर्णधार  केएल राहुलची(KL Rahul) बॅट आयपीए २०२२मध्ये सातत्याने आग ओकत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध(mumbai indians) राहुलने ६२ धावांत नाबाद १०३ धावांची खेळी केली. राहुलच्या खेळीच्या जोरावर त्याच्या संघाला विजय मिळवता आला. मात्र त्यानंतरही केएल राहुल आणि त्याच्या संघाला या सामन्यानंतर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. Lucknow super giants players fined for slow over rate against mumbai indians

अधिक वाचा - राम मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये, प्रकृती गंभीर

राहुलवर बसला दंड

लखनऊ सुपर जायंट्स (LSG)चा कर्णधार लोकेश राहुलवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल सामन्यात धीम्या ओव्हर गतीसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा राहुलवर धीम्या ओव्हर गतीसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्यांदा त्याच्यावर १२ लाखांचा दंड ठोठावला होता. 

दुसऱ्यांदा बसला दंड

आयपीएलमध्ये जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, के एल राहुलवर २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला तर अंतिम ११मध्ये सामील अन्य खेळाडूंवर ६ लाख अथवा सामन्याच्या फीमधील २५ टक्के जे काही कमी आहे ते ठोठावण्यात आले आहे. यात पुढे म्हटले आहे की, या हंगामात ही दुसरी वेळ आहे की जेव्हा संघाने आयपीएलच्या आचारसंहितेच्या निर्धारित वेळेस ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत. 

अधिक वाचा - मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला आणि जखमी झाली

लखनऊचा शानदार विजय

लखनऊने मुंबई इंडियन्सला या सामन्यात ३६ धावांनी मात दिली. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १६८ धावा केल्या. लोकेश राहुलने सर्वाधिक नाबाद १०३ धावा केल्या. १६९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला १३२ धावाच करता आल्या. हा मुंबईचा सलग ८वा पराभव आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध राहुलचा शानदार फॉर्म कायम आहे. त्याने या सामन्यात शानदार शतक ठोकले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी