मुंबई: आयपीएलमध्ये(ipl) यंदा चाहते मैदानात जाऊन सामन्यांचा आनंद घेत आहेत. १५व्या हंगामातील ७वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये(brebourne stadium) चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) आणि लखनऊ सुपरजायंट(lucknow supergiants) यांच्यांत खेळवण्यात आला. या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडला. मात्र या सामन्यात लखनऊ सुपर जायंटचा फलंदाज आयुष बदोनीचा एक सिक्स चाहतीसाठी खूप महागडा ठरला. कारण हा शॉट सरळ जाऊन महिलेच्या डोक्यावर लागला. Lucknow supergiants ayush badoni six hits to women head
अधिक वाचा - लकी लोकांच्या हातावर असते 'ही रेषा'!
लखनऊ सुपर जायंट्सला सामना जिंकवण्यासाठी १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या. चेन्नईकडून गोलंदाजी करण्यासाठी शिवम दुबे आला होता. तर लखनऊकडून इविन लुईस आणि आयुष बदोनी पिचवर होता. ओव्हर्च्या पहिल्या बॉलवरच आयुषने स्वीप शॉट खेळताना डीप स्क्वेअर लेगवर लांब सिक्स ठोकला. मात्र आयुषच्या या शॉटमुळे स्टँड्समध्ये बसलेली एक महिला दुखापतग्रस्त झाली. हा बॉल सरळ जाऊन एका महिला चाहतीच्या डोक्यावर बसला. त्यानंतर महिला बराच वेळ डोके पकडून बसली होती. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ayush Badoni Six Hits Spectator During LSG vs CSKhttps://t.co/O2lRuDTJlP
— MohiCric (@MohitKu38157375) March 31, 2022
आयुष बदोनीने आयपीएल २०२२च्या सुरूवातीलाच नाव कमवले आहे. बदोनीने आपल्या पहिल्याच सामन्यात धमाल केली होती. त्यानंतर या सामन्यातही बदोनीनने आपल्या संघासाठी सामना संपवला. त्याने सीएसकेविरुद्ध ९बॉलवर १९ धावांची शानदार खेळी केली. सामन्याच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये इविन लुईस आणि आयुष बदोनी यांनी मिळून १३ बॉलमध्ये नाबाद ४० धावा ठोकल्या.
अधिक वाचा - मुंबईत बाईक-टॅक्सी सेवा परमिशन
आयुष बदोनीचा जन्म ३ डिसेंबर १९९९मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. बदोनी डोमेस्टिक स्तरावर दिल्लीसाठी खेळतो. बदोनीने भारतासाठी अंडर १९ क्रिकेटही खेळले आहे. या २०१८मध्ये त्याने आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी अंडर १९मध्ये केवळ २८ बॉलमध्े ५२ धावा ठोकल्या होत्या. तो एक ऑलराऊंडर आहे.